Uddhav Thackeray 1 Sarkarnama
मराठवाडा

Uddhav Thackeray : दुसऱ्यांदा बॅग तपासणी, आता मोदींची बॅग महाराष्ट्रातून जाताना तपासा; ठाकरेंचे निवडणूक आयोगाला चॅलेंज

Uddhav Thackeray Election Commission PM Narendra Modi Maharashtra : उद्धव ठाकरेंची सलग दुसऱ्यांदा बॅग तपासणी झाली आहे. यावर त्यांनी निवडणूक आयोगाला चॅलेंज दिले आहे. ते पूर्ण होणार का?

Pradeep Pendhare

Latur News : उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. राज्यात ते तब्बल 36 सभा घेत आहेत. यासाठी सभास्थळी वेळेत पोचण्यासाठी उद्धव ठाकरेंनी हवाई मार्गाच्या वापरावर भर दिलाय. गेल्या काही दिवसांपासून त्यांची हेलिकॉप्टरने हवाई उड्डाणे सुरू असतानाच, दोन दिवसांपासून त्यांना वेगळ्याच प्रसंगांना समोरे जावे लागत आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जात आहे. लागोपाठ दोन दिवस बॅगांची तपासणी झाल्याने उद्धव ठाकरेंनी काहीसा संताप व्यक्त केला असून, सर्वांना समान कायदा यानुसार निवडणूक आयोगाने मोदी, शाह यांची बॅग तपासावी. परंतु या बॅगा महाराष्ट्रात येताना नाहीतर जाताना तपासाव्यात, असे चॅलेंज दिले आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांच्या पक्षाला विधानसभेची निवडणूक प्रतिष्ठेची आहे. या निवडणुकीवरून त्यांचे पक्षाचे महाराष्ट्रातील अस्तित्व ठरणार आहे. यासाठी उद्धव ठाकरे महाराष्ट्र पिंजून काढत आहे, तर आदित्य ठाकरे मुंबईसाठी रक्ताचे पाणी करताना दिसत आहे. हे बाप-लेक संपूर्ण भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अंगावर घेत आहे. यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महायुतीमधील भाजप अन् एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील राजकीय युद्ध चांगलेच पेटले आहे. यातून चढाओढ रंगली आहे.

उमेदवारांसाठी मतदारांपर्यंत वेगापर्यंत पोचण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी राज्यात 36 सभांचे नियोजन केले असून, हवाई मार्गाचा अवलंब करत आहेत. परंतु गेल्या दोन दिवसांपासून ते वेगळ्या प्रसंगांसमोरे जात आहे. निवडणूक (Election) आयोगाने नेमलेले अधिकाऱ्यांनी काल त्यांच्या बॅगांची तपासणी केले. या तपासणी 24 तास उलटत नाही तोच, आज देखील बॅगांची तपासणी केली. लातूर जिल्ह्यातील औस इथं हा प्रकार झाला.

उद्धव ठाकरे यांनी दोन्ही वेळच्या बॅग तपासणीचे चित्रीकरण स्वतः केले आणि ते चित्रीकरण रिलीज देखील केले. उद्धव ठाकरे यांनी औस इथं दुसऱ्यांदा बॅग तपासणी झाल्यावर निवडणूक आयोगाला एक चॅलेंज दिले आहे. कायदा सर्वांना समान असतो. हाच कायदा मोदी आणि शाह यांना का नाही? असा प्रश्न केला.

महायुतीच्या चक्रव्युहात अडकू नका

'उद्धव ठाकरेंना संपवल आहे ना, मग उद्धव ठाकरेंना का घाबरता, असे म्हणत सोलापूर मला जायचे होते. हेलिकॉप्टरने मला जायला नो-एन्ट्री, कारण मोदी येणार आहेत. सर्व विमान उड्डाणास नकार, नागरिकांना रस्त्याने फिरणे बंद, हे कोण टिकोजीराव? येणार, अन् भाई और बहिणो म्हणणार. माझी बॅग तपासली जाते, तर मोदी आणि शाह यांची बॅग तपासली गेलीच पाहिजे. माझी येताना तपासता, तशी मोदी आणि शाह यांची महाराष्ट्रातून जाताना तपासा, अशी मागणी करताना महाराष्ट्राला लुटून घेऊन चाललेत. पुन्हा यांना मतदान करून चक्रव्युहात अडकू नका. महायुतीला मत म्हणजे, गुजरातला मत', असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

काय दरिद्रीपणा?

उद्धव ठाकरे म्हणाले, "आता परत बॅग इथं तपासली. निवडणूक आयुक्तांना सांगतो, तुमच्याकडे जास्तीची माणसे असतील, तर माझ्या कपड्यांच्या बॅगांसाठी एक गाडी द्या. माझ्याकडेचे कपडे तुम्हीच धुवा. माझ्याकडे ओझे कमी होईल. पण रोज सकाळी माझे कपडे मला द्या. नाहीतर ते देखील ढापाल. काय आहे हा दरिद्रीपणा? काल झाल, आज झालं. पुढचा दौरा आहे, तिथं पण तपासणी करा". पण यानिमित्ताने माझी बंद झालेली फोटोग्राफी पुन्हा सुरू झाली, याच्यासारखा दुसरा आनंद काय! माझ्यातला कलाकार यानिमित्ताने पुन्हा जागा झाला. व्हिडिओ काढताना कॅमेरा स्थिर होता. माझ सर्व स्थिरच असतं. सरकारपण स्थिरच होतं. पण यांनी नालायकपणा आणि सरकार गेलं. नाहीतर पाच वर्ष स्थिरपणे काढली असती, अशी टिप्पणी देखील उद्धव ठाकरेंनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT