Mumbai News : अमरावती इथल्या बडनेरा विधानसभेचे आमदार रवी राणा यांनी केलेल्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच संतपाले आहेत.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना तंबी द्यावी, असा सल्ला देखील दिला आहे. अजित पवार यांची रवी राणा यांच्याविषयी सूचनेची देवेंद्र फडणवीस दखल घेणार का? अशी चर्चा महायुतीत रंगली आहे.
आमदार रवी राणा महायुतीमध्ये असून, ते युवा स्वाभिमान पक्षाचे अमरावतीमधील बडनेरा विधानसभा मतदारसंघात उमेदवारी करत आहे. अमरावतीमध्ये भाषण करताना रवी राणा यांनी एक जागा कमी झाली, तर काय फरक पडतो, असे विधान केले होते. त्यांचे हे विधान चांगलेच चर्चेत आहे. या विधानावर अजित पवार (Ajit Pawar) चांगलेच संतापले आहेत. रवी राणा यांची कानउघडणी केली आहे.
अजित पवार यांनी रवी राणा (Ravi Rana) यांची कानउघडणी करताना, लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुकांकडे लक्ष वेधले. रवी राणा यांना वाचळवीर म्हणताना, लोकसभेला त्यांच्या पत्नी याच कारणांमुळे पराभूत झाला असून, तेच कारणीभूत आहेत, असे अजितदादांनी म्हटले. विशालकाले विपरीत बुद्धीसारखे रवी राणा वागत आहेत. त्यांच्याबद्दल बोलण्याची इच्छा नाही. बोललेल बरं नाही. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना समज द्यावी, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.
लोकांना फार नकारात्मक बोलले आवडत नाही. लोकं काही काही बोलत असतात. प्रत्येक गोष्टीला उत्तर देत बसलो, तर काय होईल. विधानसभेला मी रवी राणांना दोनदा समर्थन दिले आहे. पण, अशी विधान करणे कितपत योग्य आहे. देवेंद्र फडणवीस यांनी याची दखल घेऊन रवी राणा यांना तंबी देण्याची गरज आहे, असे अजितदादांनी म्हटले आहे.
रवी राणा यांच्या या विधानावर अजितदादांची प्रतिक्रिया येताच, या सर्वांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील टायमिंग साधले आहे. रवी राणा यांना ही निवडणूक अवघड जात असून, ते पैशांवर निवडणूक लढवत आहे. लोकसभेमध्ये नवनीत राणाला पराभूत करून गुंडशाहीला उत्तर जनतेने दिले.
नवनीत राणा यांना भान असले पाहिजे. त्यांना गेट विल सून, लवकर बरे व्हा, असे टोला सुषमा अंधारे यांनी लगावला. रवी राणा हे विनाशकाले विपरीत बुद्धी आहे, तर तिकीट देतांना तुम्हाला कळलं नाही का? राणा यांना माहिती आहे, आपला पराभव आहे. लोकं त्यांना कंटाळली आहेत. भाजपला गुडव्हील करायचं अन् निवडणूक लढायची. पण ते पराभवाच्या छायेत आहे, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.