Congress Vs BJP Sarkarnama
मराठवाडा

Latur City Assembly Constituency : अमित देशमुखांच्या बालेकिल्ल्याला भाजपनं घेरलं? भाजपकडे इच्छुकांच्या रांगा!

Pradeep Pendhare

Latur News : राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजताच, लातूर शहर विधानसभेच राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सर्वच राजकीय पक्ष्यांच्या हालचालींना वेग आलाय.

चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अमित देशमुख यांना, यावेळी भाजपाकडून तगड आव्हान देण्याची तयारी आहे.

लातूर शहर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा (Congress) बालेकिल्ला मानला जातो. दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांनी याच मतदारसंघातून सलग 5 वेळा प्रतिनिधित्व कले आहे. विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर, त्यांचे चिरंजीव अमित देशमुख, गेल्या 3 टर्मपासून लातूर शहर विधानसभेच प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे या मतदार संघावर काँग्रेसची पकड मजबूत आहे. मात्र असं असताना यावेळी, भाजपाकडून अमित देशमुख यांना तगड आव्हान देण्यासाठी, योग्य उमेदवार उभा करण्याची तयारी सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं (BJP) काँग्रेसचं घर फोडत काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनेला भाजपत प्रवेश दिला. त्यामुळे डॉ.अर्चना पाटील चाकूरकर यांच्या नावाची देखील चर्चा सुरू आहे. पक्षाने संधी दिल्यास मोठ्या ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच डॉ. अर्चना पाटील चाकूरकर सांगत आहेत.

2019 विधानसभा निवडणुकीचं चित्र

3 लाख 98 हजार 300 मतदार संख्या असलेल्या लातूर शहर मतदार संघात यंदाही तिरंगी लढत होणार आहे. मात्र असं असलं तरी 2019 विधानसभा निवडणुकीत लातूर शहरात काँग्रेसचे अमित देशमुख यांना 1 लाख 11 हजार 156, भाजपचे शैलेश लाहोटी यांना 70 हजार 741, तर वंचित बहुजन आघाडीचे राजा मनियार यांना 24 हजार 604 मतं मिळाली होती.

भाजपचा उमेदवार फायनल नाही

2019 च्या विधानसभा निवडणुकी लातूर शहर विधानसभेत देखील तिरंगी लढत झाली होती. मात्र यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा म्हणावा तेवढा प्रभाव मतदार संघात दिसला नाही. त्यामुळे थेट काँग्रेसविरुद्ध भाजप, अशीच लढत झाली होती. या लढतीत अमित देशमुख यांनी तिसऱ्यांदा 40 हजार 415 मतांची आघाडी घेत विजय मिळवला होता. मात्र या वेळेला भाजपकडून डॉ. अर्चना पाटील चाकूरकरांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे भाजपचा उमेदवार जरी आता फायनल झाला नसला, तरी यावेळीस लातूर शहर विधानसभेची निवडणूक ही, काँग्रेससाठी प्रतिष्ठेशी आणि चुरशीची राहणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT