Maharashtra Assembly Election 2024 : संभाजीनगर जिल्ह्यातील जागा वाटपात कोणता पक्ष `त्याग` करणार ?

Sambhajinagar District Seat Distribution: अशावेळी संभाजीनगर जिल्ह्यातील या नऊ मतदारसंघाचे वाटप कसे होते? कोण समजूतदार पणाची भूमिका घेणार? कोण `त्याग` करणार याकडे ही सगळ्यांचे लक्ष असणार आहे.
Shivsena-Bjp-Chhatrapati Sambhajinagar
Shivsena-Bjp-Chhatrapati SambhajinagarSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar Assembly Election : विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सगळ्या उत्सूकता आहे ती उमेदवारी याद्यांची. महायुती-महाविकास आघाडी दोन्ही पक्षात जागा वाटपावर अंतिम निर्णयासाठी बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये जागा वाटपात कोणाची सरसी होणार? मोठा भाऊ कोण ठरणार? यावर चर्चा सुरू झाल्या आहेत.

2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपने जिल्ह्यातील सर्व 9 मतदारसंघात विजय मिळवला होता. (Chhatrapati Sambhajinagar) काँग्रेस-आघाडीला क्लीन स्वीप देत शिवसेनेने 6 तर भाजपने तीन जागा जिंकल्या होत्या. राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणानंतर शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीन पक्षांची महायुती आहे. हे तीनही पक्ष एकत्रितपणे विधानसभा निवडणुकाला सामोरे जात आहे.

अशावेळी संभाजीनगर जिल्ह्यातील या नऊ मतदारसंघाचे वाटप कसे होते? कोण समजूतदार पणाची भूमिका घेणार? कोण `त्याग` करणार याकडे ही सगळ्यांचे लक्ष असणार आहे. राज्यातील 288 पैकी दीशेहून अधिक जागांवर एकट्या भाजपने दावा सांगत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला `त्याग`करण्याची तयारी ठेवण्यास सांगितल्याचे बोलले जाते. अशावेळी गेल्या विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या जागांपैकी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी `त्याग` भाजप की शिवसेना करणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Shivsena-Bjp-Chhatrapati Sambhajinagar
Congress Political News : काँग्रेसला जिल्ह्यात नऊ पैकी हव्यात सहा जागा ; आघाडीत ताणाताणी होणार..

2019 मध्ये शिवसेनेने जिल्ह्यातील संभाजीनगर पश्चिम, मध्य, वैजापूर, पैठण, सिल्लोड, कन्नड या सहा जागा लढवल्या होत्या. या सहाही जागा शिवसेनेने जिंकल्या. (Mahayuti) तर भाजपने फुलंब्री, गंगापूर आणि संभाजीनगर पुर्व या तीन जागा लढवत विजय मिळवला होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपचे चंद्रकांत खैरे यांचा एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी पराभव केला होता.

विधानसभेला याचे तीव्र पडसाद जिल्हाभरात उमटले आणि शिवसेना-भाजप युतीने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसह इतर विरोधकांना क्लीन स्वीप देत इतिहास घडवला होता. 2024 च्या विधानसभा निवडणुकीला समोर जातांना महायुती-महाविकास आघाडी दोघांसमोरही मोठी आव्हाने आहेत. आरक्षणाच्या प्रश्नावरून सत्ताधारी महायुतीची कोंडी झाली आहे, तर महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत आलेले अपयश या निमित्ताने धुवून टाकण्याची संधी चालून आली आहे.

Shivsena-Bjp-Chhatrapati Sambhajinagar
Mahayuti Big Update : मोठी बातमी! CM शिंदे अन् DCM अजित पवारांचा महत्त्वपूर्ण दिल्ली दौरा तडकाफडकी रद्द; काय आहे कारण?

महायुतीचे जागा वाटप सुरळीत होणार? की मग बंडखोरी उफाळून येणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे. महायुती-महाविकास आघाडीकडून जागा वाटप अंतीम झाल्याचे सांगितले जात आहे. परंतु उमेदवारी याद्या मात्र कोणीच जाहीर करताना दिसत नाहीये. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुक एकाच टप्प्यात होणार असल्याने उमेदवारांना प्रचाराला पुरेसा वेळ मिळावा यासाठी सगळेच पक्ष येत्या तीन-चार दिवसात आपापल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून लढण्याची पुर्ण तयारी केली असतांना भाजपला माघार घ्यावी लागली होती. आता `त्याग` करण्याची वेळ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची आहे, असे भाजपच्या गोटातून बोलले जाते. लोकसभेला नमते घेतल्यानंतर यावेळी 2019 मध्ये लढवलेल्या जागांपेक्षा किमान दोन जागा अधिक मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीत मोठा भाऊ कोण ठरणार? याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com