vanchit bahujan aghadi sarkarnama
मराठवाडा

Yogendra Yadav: अकोल्यात 'वंचित'चा राडा, योगेंद्र यादव यांचे भाषण पाडले बंद

Vanchit Bahujan Aghadi: कार्यकर्त्यांच्या सुरक्षेच्या घेरात योगेंद्र यादव यांना कार्यक्रम स्थळावरून बाहेर काढण्यात आले.

Roshan More

Yogendra Yadav News : वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अकोल्यामध्ये भारत जोडे अभियानाच्या कार्यक्रमात गोंधळ घालत योगेंद्र यादव यांचे भाषण बंद पाडले. कार्यकर्त्यांच्या सुरक्षेच्या घेरात योगेंद्र यादव यांना कार्यक्रम स्थळावरून बाहेर काढण्यात आले. भारत जोडो अभियानाच्या वतीने विचारसभा आयोजित केली होती. या विचारसभेत योगेंद्र यादव बोलत असताना वंचितच्या कार्यकर्त्यांनी राडा करत सभा बंद पाडली.

योगेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनात 'लोकशाही सुरक्षा आणि आपलं मत' या चर्चेवर विचारसभा सुरू होती. वंचितच्या कार्यकर्त्यांनी या सभेत गोंधळ घातला. कार्यकर्त्यांनी सभा ठिकाणावरील खुर्च्या आदळल्या. लोकांना कार्यक्रमास्थळावरून बाहेर काढले. व्यासपीठावर धाव घेत वंचितच्या कार्यकर्त्यांनी माईकची देखील तोडफोड केली. तसेच योगेंद्र यादव यांना घेरले.

योगेंद्र यादव यांना पोलिसांनी कार्यक्रमस्थळावरून बाहेर काढले. मात्र, वंचितच्या कार्यकर्त्यांनी योगेंद्र यादव यांच्या गाडीवर लाथबुक्क्या मारल्याची माहिती आहे. पोलिस बंदोबस्तामध्ये योगेंद्र यादव यांना अकोल्यातून पुढे पाठवण्यात बाहेर नेणार असल्याची माहिती आहे.

150 मतदारसंघात 'भारत जोडो'

विविध संघटनांनी एकत्रित येऊन भारत जोडे अभियन सुरु केले आहे. 'भारत जोडो'कडून महाराष्ट्र विधानसभेच्या 288 पैकी 150 मतदारसंघात काम करण्यात येणार आहे. यामध्ये विदर्भातील 40 जागांचा समावेश आहे, असे भारत जोडो अभियानाचे राष्ट्रीय संयोजक योगेंद्र यादव यांनी सांगितले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT