Ajit Pawar : अजितदादांचा ठाकरेंना मोठा धक्का; पुण्याच्या जिल्हाप्रमुखांनाच फोडले

Shirur Assembly constituency: शिरूर विधानसभा मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अशोक पवार यांच्याविरोधात ज्ञानेश्वर कटके यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
Dyaneshwar Katke in NCP
Dyaneshwar Katke in NCPSarkarnama
Published on
Updated on

Pune News : ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उध्दव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पुण्याचे जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर (माऊली) कटके यांनी सोमवारी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी हाती घड्याळ बांधल्याने ठाकरेंसोबतच महाविकास आघाडीसाठीही हा मोठा झटका मानला जात आहे.

ज्ञानेश्वर कटके यांचा आज मुंबईत पक्षप्रवेश झाला. यावेळी अजित पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे व इतर नेते उपस्थित होते. कटके यांनी शिरूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात अशोक पवार हे विद्यमान आमदार असून ते शरद पवार यांच्या पक्षाचे आहेत. त्यामुळे शिरूरमध्ये अशोक पवार विरुध्द ज्ञानेश्वर कटके अशी लढत होईल, अशी चर्चा आहे.

Dyaneshwar Katke in NCP
Sunil Tingre: धाकधूक वाढली! वडगाव शेरी भाजपाच्या वाट्याला? सुनील टिंगरेंनी घेतली दादांची भेट

दरम्यान, कटके यांच्यासोबत सोमवारी कोलवडीचे सरपंच विनायक गायकवाड व उपसरपंच नाना गायकवाड, पेठगावचे सरपंच सूरज चौधरी, नायगावचे सरपंच गणेश चौधरी, माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष हगवणे, उद्योजक सुजित चौधरी, नायगावच्या ग्रामपंचायत पतसंस्थेचे चेअरमन सुनिल हगवणे, वडगावचे ग्रामपंचायत सदस्य रविंद्र शेलार, उद्योजक प्रतिक चौधरी, शिवाजी चौधरी या प्रमुख कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. अशोक पवार वगळता इतर सर्व आमदार अजित पवारांसोबत गेले आहेत. त्यापैकी बहुतेकांची उमेदवारी निश्चित आहे. शिरुर मतदारसंघातून अशोक पवार यांच्याविरोधात अजित पवार कुणाला उमेदवारी देणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.

Dyaneshwar Katke in NCP
Purva Walse Patil: 'शरद पवारसाहेब काल, आज आणि उद्याही...', दिलीप वळसे पाटील यांच्या पाठोपाठ मुलगी पूर्वा यांचही मोठं वक्तव्य

कटके यांना पक्षात आणत अजित पवारांनी आघाडीला धक्का दिला आहे. आज किंवा मंगळवारी अजित पवारांच्या पक्षाची यादी जाहीर केली जाऊ शकतो. आधी कटके यांना प्रवेश झाल्याने त्यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com