Anuradha chavan, atul Chavan sarkarnama
मराठवाडा

MLA Anuradha Chavan : भाजप आमदार अनुराधा चव्हाण यांच्या पतीच्या तडकाफडकी राजीनाम्याने वादळ : वादग्रस्त 'कारकीर्दी'चीच जास्त चर्चा

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्या तडकाफडकी राजीनाम्याने मराठवाड्यातील राजकारण तापले आहे. एका चांगल्या व कर्तव्य दक्ष अधिकाऱ्याचा राजकारणाने बळी घेतला, अशा प्रतिक्रिया या भागातून उमटू लागल्या आहेत.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्या तडकाफडकी राजीनाम्याने मराठवाड्यातील राजकारण तापले आहे. एका चांगल्या व कर्तव्य दक्ष अधिकाऱ्याचा राजकारणाने बळी घेतला, अशा प्रतिक्रिया या भागातून उमटू लागल्या आहेत.

32 वर्षांच्या प्रदीर्घ प्रशासकीय सेवा काळात त्यांनी केलेली उत्कृष्ट कामगिरी, शासनाकडून त्यांचा झालेला गौरव, पदोन्नती याचे दाखलेही दिले जात आहेत. तर दुसरीकडे त्यांच्याच कार्यकाळात त्यांच्यावर झालेले गैरव्यवहाराचे आरोप आणि वादही या निमित्ताने चर्चेला येऊ लागले आहेत.

भाजपाच्या फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या आमदार अनुराधा चव्हाण यांचे पती असलेले अतुल चव्हाण राजीनामा मागे घेण्याची शक्यता असली तरी हे आरोप त्यांची पाठ सोडत नाहीयेत. फेब्रुवारी 2026 मध्ये 250 कोटींच्या बोगस वर्क ऑर्डर घोटाळ्यामुळे ते चर्चेत आले. याच काळातील त्यांच्या खात्यातील QR कोड घोटाळाही समोर आला होता.

जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या कामांच्या बोगस वर्क ऑर्डर काढून 250 कोटींचा घोटाळा केल्याचा ठपका त्यांच्या विभागावर आहे. QR कोडमध्ये फेरफार करून एकाच्या नावाचा QR कोड आणि वर्क ऑर्डर दुसऱ्याच्या नावाने काढल्याचा हा घोटाळा चांगलाच गाजत आहे.

यात टेंडर क्लार्क, विभागीय लेखाधिकारी, कार्यकारी अभियंता यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. तत्कालीन मुख्य अभियंता म्हणून अतुल चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली होती. परंतु याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी आक्षेप घेतला.

स्वतःच्याच विभागातील अधिकाऱ्यांकडून चौकशी म्हणजे फार्स होईल, असे म्हणत निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशीची त्यांनी मागणी केली होती. फुलंब्रीचे सरपंच मंगेश साबळे यांनी PWD मधील कथित QR कोड स्कॅनर घोटाळा दाबल्याचा आरोप करून मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्याविरोधात आंदोलन केले होते.

मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्या आदेशानुसार घोटाळा दाबला जात आहे. पत्नी आमदार असल्याने पदाचा गैरवापर करून तक्रारदारांना धमक्या दिल्या जात आहेत, असा आरोप करत चौकशी होईपर्यंत चव्हाण यांची मराठवाड्याबाहेर बदली करावी, अशी मागणी साबळे यांनी केली होती.

राजकीय बॅनरबाजीचा वाद

आमदार पत्नी अनुराधा चव्हाण यांच्या प्रचार आणि कार्यक्रमांच्या बॅनरवर अतुल चव्हाण यांचा फोटो छापला जात होता. त्यांनी स्वत: लेखी पत्र लिहून कार्यकर्त्यांना आवरण्याची विनंती केली होती. सरकारी अधिकाऱ्याचा फोटो राजकीय बॅनरवर आल्याने कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह येते आणि RTI च्या तक्रारी वाढल्या आहेत, असे त्यांनी आपल्या लेखी पत्रात म्हटले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT