Sharad Pawar : गेल्या महिन्यात शरद पवारांची घेतली भेट ; जळगावच्या नेत्याचा दोन्ही राष्ट्रवादींबाबत खळबळजनक दावा, पुणे-मुंबईतील घडामोडींतून लावला अंदाज

Sanjay Pawar On NCP merger : संजय पवार यांनी गेल्या महिन्यातच शरद पवार यांची भेट घेतली होती. आता त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनिकरणावर खळबळजनक दावा केला आहे.
Sharad Pawar Meeting Sparks Fresh Speculation Over NCP Politics
Sharad Pawar Meeting Sparks Fresh Speculation Over NCP PoliticsSarkarnama
Published on
Updated on

NCP merger Maharashtra politics : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. परंतु दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा काहीच संबंध नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

पंरतु असे असताना आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जळगाव जिल्हाध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. लवकरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असा ठोस दावा त्यांनी केला आहे. पुणे-मुंबईत घडलेल्या वेगवान घडामोडीतून त्यांनी हा अंदाज काढला आहे.

संजय पवार एका खासगी कार्यक्रमात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या विषयावर पुणे व मुंबईत बैठका झाल्या आहेत. बैठकांचा सुरु असलेला सपाटा, दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये एकमेकांसोबत सुरु असलेल्या गाठीभेटी, त्यातून घडणाऱ्या घडामोडी पाहाता, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेस असे दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र येतील. पुढच्या सहा महिन्यांत दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस ‘घड्याळ’ चिन्हावर निवडणुका लढविताना दिसतील, असा दावा संजय पवार यांनी केला आहे.

माजी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी अपघाती निधन झाले. ते हयात असतानाच दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र येणार असल्याच्या चर्चा व हालचाली सुरु होत्या. मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर काही महिना दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र येण्याचा विषय मागे पडला होता. आता मात्र, नव्याने तो दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण होण्याची चर्चा अचानक सुरू झाली आहे.

Sharad Pawar Meeting Sparks Fresh Speculation Over NCP Politics
Sharad Pawar News: शरद पवारांनी घेतली तिसऱ्यांदा राज्यसभेच्या खासदारकीची शपथ; पवारांच्या तीन पिढ्या एकाचवेळी संसदेत

विशेष म्हणजे गेल्या महिन्यातच जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. संजय पवार यांनी शरद पवार यांच्याकडून त्यांचा फोटो राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बॅनरवर छापण्याची लेखी परवानगी मागितली होती व ती शरद पवार यांनीही दिली.

दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त संजय पवार यांनी त्यांच्या निवासस्थानासमोर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे लावलेल्या बॅनरमध्ये शरद पवार यांचा फोटो वापरला होता.

Sharad Pawar Meeting Sparks Fresh Speculation Over NCP Politics
Nashik Municipal Corporation : गिरीश महाजनांची नाशिक महापालिका प्रशासनाकडून दिशाभूल? ठेकेदारांना स्टार रेट'देण्याच्या वादाला आता नवे वळण

दरम्यान, यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी कोणताही आक्षेप नोंदविला नाही. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांच्या मुंबई व पुणे येथे बैठका सुरू आहेत. त्यातील घडामोडी पाहता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) हे दोन्ही पक्ष लवकरच एकत्र येतील व आगामी निवडणुका ‘घड्याळ’ चिन्हावर लढतील, असा दावा जिल्हाध्यक्ष पवार यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com