Atul Save-Sanjay Shirsat News Sarkarnama
मराठवाडा

Atul Save-Sanjay Shirsat News : कार्यक्रमाला पालकमंत्री शिरसाट दीड तास लेट, सावे म्हणाले, खैरेंसारखे वागू नका!

BJP leader Atul Save gives sharp advice to MLA Sanjay Shirsat, urging him to attend events on time and avoid behaving like Chandrakant Khaire. : पालकमंत्रीच आले नसल्याने सगळ्यांनाच ताटकळत बसावे लागले. सावे सारखे शिरसाट यांना फोन करून लवकर या, असे सांगत होते.

Jagdish Pansare

Shivsena-BJP News : राजकीय मंडळी जशी एखाद्या कार्यक्रमाला वेळवर न पोहचण्यासाठी ओळखले जातात, तसे वक्तशीरपणासाठीही काही नेत्यांचे नाव घेतले जाते. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशी अनेक नावे आहेत जी वेळेचे काटेकोरपणे पालन करतात. तर ठरलेल्या वेळेवर कधीही कार्यक्रमाला न पोहचणाऱ्यांची यादी भली मोठी आहे. या यादीत आता राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचे नाव जोडले जाते की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महापालिकेच्या एका कार्यक्रमात ओबीसी मंत्री अतुल सावे, (Sanjay Shirsat) पालकमंत्री संजय शिरसाट, आमदार विक्रम काळे, प्रदीप जैस्वाल आदी एकत्र आले होते. नियोजित कार्यक्रम हा सकाळी अकरा वाजताचा होता. पालकमंत्री संजय शिरसाट वगळता सगळे पाहुणे वेळत कार्यक्रमस्थळी हजर होते. परंतु पालकमंत्रीच आले नसल्याने सगळ्यांनाच ताटकळत बसावे लागले. अतुल सावे सारखे शिरसाट यांना फोन करून लवकर या, असे त्यांना सांगत होते.

अखेर साडेबारा वाजता संजय शिरसाट कार्यक्रमाला आले अन् तिथून पुढे दोन तास नेत्यांची भाषणं झाली. सावे (Atul Save) यांनी शिरसाट यांना फोन करून या ना लवकर, इथे लोकांना किती वेळ ताटकळत ठेवता. तुम्ही खैरे सारखे करू नका, असा टोला लगावला. सावे-शिरसाट यांच्यातील हा कलगितुरा एवढ्यावर थांबला नाही. तर महापालिका प्रशासक जी.श्रीकात यांच्या बदलीवरूनही दोघांमध्ये जुंपल्याचे पहायला मिळाले.

महापालिकेचा सन्मान वाढविण्याचे चांगले काम प्रशासक जी. श्रीकांत करत आहेत. मंत्री अतुल सावे जरी मुख्यमंत्र्यांच्या जवळचे असले तरी मी उपमुख्यमंत्र्याच्या जवळचा आहे. महापालिका प्रशासकांची बदली होऊ देणार नाही, हे मी लिहून देतो, त्यांनी केलेल्या कामाचा कॅबिनेटमध्ये उल्लेख केला जाईल, असे संजय शिरसाट जाहीर कार्यक्रमात म्हणाले.

महापालिकेला नेहमी बदनाम केले जाते. काही लोक चांगल्या सूचना करतात, त्याचे पालन केले तर महापालिकेचे कौतुकही होईल. एवढी दिवस कामे का झाली नाहीत, हे विचारणार नाही, पण जी. श्रीकांत यांनी अधिकाऱ्यांची मानसिकता बदलली आहे. त्यांनी सुरू केलेली कामे पुढे चालविण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे.

महापालिकेला निधी कमी पडू दिला जाणार नाही, पालकमंत्री असल्याने जास्तीत जास्त देण्याचा माझा प्रयत्न राहील, अशी ग्वाही शिरसाट यांनी देतानाच जी.श्रीकांत यांना आपला भक्कम पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. अंबादास दानवे यांनी शहरात पाणी टंचाई असताना प्रशासक क्रिकेट पाहण्यात मस्त आहेत, असे ट्वीट काही दिवसांपूर्वी केले होते. त्यावर दानवे यांचे नाव न घेता काही जणांना आयुक्तांचे क्रिकेट खुपते, असा टोला शिरसाट यांनी लगावला.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT