Water Issue News : छत्रपती संभाजीनगर महापालिकेवर गेली 25 वर्ष शिवसेना-भाजप युतीची एकहाती सत्ता होती. जायकवाडीसारखे महाकाय धरण शहरापासून 50 किलोमीटर अंतरावर आहे, तरीही संभाजीनगरकरांना पाण्यासाठी दहा ते बारा दिवस वाट पहावी लागते. शहरवासीयांच्या तोंडचे पाणी कोणामुळे पळाले? यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कायम आरोप- प्रत्यारोप होत असतात.
अनेक वर्षांची ओरड लक्षात घेऊन अखेर पाच वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Chhatrapati Sambhajinagar) संभाजीनगर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी 1680 कोटींची योजना मंजूर केली होती. मात्र तीन वर्षात पूर्ण करावयाची योजना पाच वर्षे उलटून गेली तरीही पूर्ण होत नाहीये. दरवर्षीप्रमाणे कडक उन्हाळ्याची चाहूल लागताच नियमित पाण्यासाठी नागरिकांचा टाहो सुरू झाला आहे.
दुसरीकडे जिल्ह्यातील मंत्री आणि पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास नेणाऱ्या महाराष्ट्र जल प्राधिकरण, महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून नियमित पाणीपुरवठ्यासाठी वेगवेगळे मुहूर्त सांगितले जात आहेत. काही दिवसांपूर्वी राज्याचे ओबीसी मंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी शहराला जून महिन्यात नियमित पाणीपुरवठा केला जाईल, असे एका जाहीर कार्यक्रमात सांगितले होते.
यावर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी मात्र सावेंचा मुद्दा खोडून काढत शहराला एप्रिल महिन्यातच पाणी दिले जाईल, असा दावा केला. मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे मी जे बोलतो ते खरं करून दाखवतो, त्यामुळे संभाजीनगरकरांना एप्रिल पासूनच पाणी मिळेल असे ठणकावून सांगितले होते. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निर्देशानुसार घेण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेच्या आढावा बैठकीत या दाव्यांवर पाणी फिरले.
विभागीय आयुक्त, महापालिकेचे प्रशासक आणि जिल्हाधिकारी यांच्यासमोर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अभियंत्यांनी पाणीपुरवठा योजनेची उर्वरित काम 26 दिवसात पूर्ण होणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले. तसेच नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी 30 एप्रिलची नवी डेडलाईन दिली आहे. त्यामुळे मंत्री अतुल सावे आणि पालकमंत्री संजय शिरसाट या दोघांचेही दावे फोल ठरण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.