Minister Atul Save news, Aurangabad
Minister Atul Save news, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Atul Save : आघाडी सरकारने काय केले ? शिंदे-फडणवीसांच्या डबल इंजिनमुळेच विकासाला वेग..

सरकारनामा ब्युरो

(Marathwada : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावरून सत्ताधारी आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने अडीच वर्षात काय केले? हे जनतेसमोर मांडावे, आमचे सरकार आल्यानंतर सहा महिन्यात आम्ही कोणते निर्णय घेतले हे सांगितले आहे? शिंदे-फडणवीस यांचे डबल इंजिनचे सरकार आल्यावर राज्यातील विकासकामांना वेग आल्याचा दावाही सावे यांनी केला आहे.

मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३८ हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमीपुजन आणि लोकार्पण करण्यात आले. (Devendra Fadanvis) मोदींचा मुंबई दौरा म्हणजे भाजपने महापालिका निवडणुकीसाठी फुंकलेले रणशिंगच असल्याचे बोलले जाते. (Atul Save) परंतु महाविकास आघाडी सरकार व मुंबई महापालिकेने केलेल्या कामांचेच उद्धाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते केले जात आहेत, असा दावा उध्दव सेनेकडून केला जात आहे.

यावर सहकार मंत्री अतुल सावे यांनी पलटवार केला आहे. सावे म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्ष सत्तेवर होते, पण त्यांच्या काळात विकासकामे पुर्णपणे ठप्प होती. काय केले हे सांगण्यासारखे नसल्यामुळेच महाविकास आघाडी आपले रिपोर्ट कार्ड जनतेसमोर सादर करू शकली नाही.

शिंदे-फडणवीसांचे डबल इंजिन सरकार सहा महिन्यांपुर्वी सत्तेवर आले आणि रखडलेल्या सगळ्या महत्वाच्या, विशेषतः मुंबईकरांच्या प्रकल्पांना मंजुरी देत कामे सुरू केली. सहा महिन्यात आमच्या सरकारने काय केले याचे रिपोर्ट कार्ड आम्ही जनतेसमोर ठेवत आहोत. मुंबई आणि राज्याचा विकास शिंदे-फडणवीस सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच करू शकतात, असा दावा देखील सावे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT