Chandrakant Khaire : मोदींची हवा आता संपली, भाजप मुंबई कधीच जिंकू शकत नाही..

Aurangabad : ठाकरेंच्या कामांचे श्रेय घेण्याचा भाजपचा प्रयत्न असला तरी मुंबईकर निवडणूकीत त्यांना जागा दाखवतील.
Shivsena Leader Chandrakant Khiare News Aurangabad
Shivsena Leader Chandrakant Khiare News AurangabadSarkarnama
Published on
Updated on

Shivsena : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हवा आता देशातून संपत चालली आहे. त्यामुळे त्यांनी मुंबईत येवून कितीही विकासाचे दावे केले, तरीही मुंबई भाजपच्या ताब्यात जावू शकत नाही, असा दावा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केला आहे.

Shivsena Leader Chandrakant Khiare News Aurangabad
Ncp News : सत्तार बारामतीत, सुप्रिया सुळे म्हणाल्या `अतिथी देवो भव` चे आमच्यावर संस्कार..

ज्या विकासकामांच्या उद्धाटन आणि भुमीपूजनासाठी पंतप्रधान मुंबई आले आहेत, ती सगळी कामे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिका आणि महाविकास आघाडी सरकारने केलेली आहेत, असा दावा देखील त्यांनी केला. (Pm Modi) मोदींच्या मुंबई दौऱ्यावरून सध्या उद्धव ठाकरेंची सेना आणि शिंदे-फडणवीस सरकारमध्ये चांगलीच जुंपली आहे.

मुंबई महापालिका डोळ्यासमोर ठेवूनच मोदींच्या दौऱ्याचे आयोजन शिंदे-फडणवीस यांनी केल्याचा आरोप केला जात असतांनाच राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी देखील मोदीजींना किती पळवणार? असा टोला लगावला. शिवसेनेच्या सर्वच नेत्यांनी मोदींच्या या दौऱ्यावर टीका केली आहे.

चंद्रकांत खैरे म्हणाले, मुंबई महापालिका ताब्यात घेण्याचे भाजपचे मनसुबे कधीच पुर्ण होणार नाहीत. पंतप्रधान मोदी यांची देशातील हवा आता संपत चालली आहे. त्यामुळे मुंबईत येवून कितीही विकासाचे दावे केले, तरी मुंबईचा खरा विकास कोणी केला हे मुंबईच्या जनतेला चांगलेच माहित आहे.

डबल इंजिनचे सरकार असल्याचे सांगत कोट्यावधींच्या कामाच्या भुमीपूजनाचा, उद्घाटनाचा भाजपचा दावा देखील खोटा आहे. कारण ही सगळी कामे मुंबई महापालिकेत सत्ता असलेल्या शिवसेनेने आणि त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने केलेली आहे. त्यामुळे ठाकरेंच्या कामांचे श्रेय घेण्याचा हा भाजपचा प्रयत्न असला तरी मुंबईकर निवडणूकीत त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत, असेही खैरे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com