Chhatrapati Sambhajinagar : राज्याचे ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या मातोश्री लीलावती मोरेश्वर सावे (वय 93) यांचे वृद्धापकाळाने गुरूवारी, ( ता. 19) दुपारी छत्रपती संभाजीनगर येथील खडकेश्वर भागातील अंजली काॅम्पलेक्स येथे निधन झाले. सावे कुटुंबांच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीत लीलावती सावे यांचा मोठा आधार होता.
त्यांचा पार्थिवावर शुक्रवारी, (ता.20) सकाळी साडेअकरा वाजता समर्थनगर येथील पुष्पनगरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, उद्योजक अजित सावे, अनिल सावे आणि डॉ. अंजली राऊत यांच्या त्या मातोश्री होत.
दरम्यान, या दुःखद घटनेनंतर शहर व जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, उद्योगसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी लीलावती यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली.
मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त
इतर मागासवर्ग बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या मातोश्री लीलावती मोरेश्वर सावे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. संपूर्ण सावे कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती प्राप्त होवो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करत मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.