A youth died while running during recruitment test news, Aurangabad
A youth died while running during recruitment test news, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad : अग्नीवीर भरती चाचणी दरम्यान धावतांना तरुणाचा दुर्दैवी मृत्यू..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : सैन्याच्या वतीने सुरू असलेल्या अग्नीवीर भरती चाचणी दरम्यान धावतांना कन्नड तालुक्यातील एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. (Aurangabad) धावण्याच्या चाचणीत पाच फुटाचे अंतर शिल्लक असतांना हा तरुण अचानक खाली कोसळला आणि यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेने जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

कन्नड (Kannad) तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील दोन सख्खे भाऊ अग्नीवीर भरतीसाठी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या मैदानावर सुरु असलेल्या भरती चाचणीसाठी आले होते. बुधवारी रात्री साडेबाराच्या दरम्यान धावण्याची चाचणी देत असतांना करण नामदेव पवार (वय- २०, रा. विठ्ठलवाडी, सिर्जापूर, ता. कन्नड, जि औरंगाबाद) या तरुणाचा मृत्यू झाला. करण आणि सागर हे दोघे सख्खे भाऊ अग्निवीर भरतीसाठी बुधवारी संध्याकाळी विद्यापीठात दाखल झाले होते. (Marathwada)

रात्री मैदानी चाचणी घेण्यात आली तेव्हा करणने तीन राऊंड पुर्ण केले होते, चौथ्या आणि शेवटच्या फेरीचे अवघे पाच फुट अंतर शिल्लक असतांना करण अचानक कोसळला. रात्री उशीरा त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून करण मृत झाल्याचे सांगितले. या प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

करणचा मृत्यू नेमका कशामुळे झाला ? हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल. करणच्या मृत्यूचा त्याच्या वडिलांना व भावाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, करणसोबत भरतीसाठी आलेला त्याचा लहान भाऊ सागर म्हणाला, आम्ही घरून आणलेली भाकरी खाल्ली. दोघे मिळून देशसेवा करण्याचे स्वप्न आम्ही पाहत होतो. करणने मैदानाच्या तीन फेऱ्या पुर्ण केल्या होत्या शेवटच्या फेरीत काही फुटांचे अंतर शिल्लक असतांनाच तो खाली कोसळला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT