Nanded : हेमंत पाटील, जाधव यांनी शिवसेना अशोक चव्हाणांना विकली..

हेमंत पाटील यांनी बंडखोरी केल्यानंतर हिंगोली-नांदेडचे संपर्कप्रमुख आनंद जाधव यांची देखील पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. (Nanded Shivsena)
Ex.Mp.Subhash Wankhede-Mp Hemant Patil News Nanded
Ex.Mp.Subhash Wankhede-Mp Hemant Patil News NandedSarkarnama

नांदेड : माजी खासदार आणि आता नुकतेच शिवसेनेत परतलेले सुभाष वानखेडे यांनी हिंगोलीचे बंडखोर खासदार आणि जिल्ह्याचे (Shivsena) शिंदे गटाचे शिवसेना संपर्कप्रमुख आनंद जाधव यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. (Hemant Patil) हेमंत पाटील नांदेडमध्ये जिल्हाप्रमुख असतांनापासून जाधव आणि पाटील या जोडीने सगळी शिवसेना अशोक चव्हाणांना विकली असा घणाघात वानखेडे यांनी केला आहे.

हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी बंडखोरी करत शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला. गेल्या महिन्यात शिवसेनेच्या बारा खासदारांनी शिंदे गटाला पाठिंबा देत असल्याचे पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिले होते. (Nanded) या बारा खासदारांमध्ये हेमंत पाटील यांचा देखील समावेश होता. हेमंत पाटील हे खासदार होण्यापुर्वी नांदेड जिल्ह्यात काही वर्ष जिल्हाप्रमुख, नगरसेवक देखील होते.

सुभाष वानखेडे आणि हेमंत पाटील हे पुर्वी एकाच पक्षात होते, त्यामुळे पाटील यांच्या बंडखोरीनंतर लगेच वानखेडे यांनी स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईत मातोश्रीवर जाऊन त्यांनी शिवबंधन बांधून घेतले होते. तसेच बंडखोर हेमंत पाटीलसह जिल्ह्यातील गद्दारांना गावात फिरू देणार नाही, असा इशारा दिला होता. त्यानंतर वानखेडे चांगलेच आक्रमक झाले आहेत.

प्रसार माध्यमांशी बोलतांना वानखेडे यांनी संपर्क प्रमुख आनंदराव जाधव व हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. वानखेडे म्हणाले, या दोघांनी जिल्ह्यातील शिवसेना काॅंग्रेसचे नेते अशोक चव्हाणांना विकली होती.

Ex.Mp.Subhash Wankhede-Mp Hemant Patil News Nanded
नमिता मुंदडा यांच्या प्रश्नात इंग्रजी शब्दांचाच भडीमार!

हेमंत पाटील यांनी बंडखोरी केल्यानंतर हिंगोली-नांदेडचे संपर्कप्रमुख आनंद जाधव यांची देखील पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर शिंदे यांनी लगेच त्यांनी पुन्हा संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर वानखेडे यांनी पाटील व जाधव यांच्यावर गंभीर आरोप केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com