Khultabad Aurangjeb Tomb, Aurangabad Latest News in Marathi, Aurangjeb kabar news
Khultabad Aurangjeb Tomb, Aurangabad Latest News in Marathi, Aurangjeb kabar news Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad : औरंगजेबाची कबर पर्यटकांसाठी बंद

सरकारनामा ब्युरो

खुलताबाद : येथील हजरत जैनोद्दीन चिश्ती दरगाह परिसरात असलेली औरंगजेब कबर आगामी पाच दिवस पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे पुरातत्व विभागाचे अधीक्षक मचाले यांनी एका पञाद्वारे आदेशित केले आहे. (Aurangabad) खुलताबाद येथील औरंगजेब कबर सध्या गत सप्ताहापासुन राजकारण्यांच्या वेगवेगळ्या विधानांमुळे चांगलीच चर्चेत असुन,या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडु नये म्हणुन पोलीस प्रशासनाबरोबरच आता पुरातत्व खात्याने खबरदारी घेतला आहे. (Aurangabad Latest News in Marathi)

पुढील पाच दिवसांसाठी कबरीचे दर्शन बंद केले आहे. एमआयएमचे नेते आमदार अकबरुद्दी ओवेसी यांनी १२ मे रोजी औरंगजेब कबरीचे दर्शन घेतल्यानंतर राज्यभरात वाद निर्माण झाला होता. शिवसेना-भाजपसह अनेक संघटनांनी एमआयएमच्या या कृतीचा निषेध करत कारवाईची मागणी केली होती. (Marathwada) तर कबरीवर जाऊन प्रार्थना करणे हा इस्लामचा भाग असल्याचा दावा एमआयएमकडून (Aimim) करण्यात आला होता.

या मुद्यावरून राज्यभरातील वातावरण चांगलेच तापले होते. भाजप-मनसेकडून शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करण्यात आले होते. तर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेणे चुकीचे असून याची चौकशी करून योग्य ती कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले होते.

भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुंबईत झालेल्या हिंदी भाषी महासंकल्प सभेत यावरून ओवेसी आणि एमआयएमवर जोरदार हल्ला चढवला होता. मनसेने तर औरंगजेबाची कबरच उखडून फेकण्याची खळबळजनक मागणी केली होती. त्यानंतरच औरंगजेब कबरीसमोर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आता पुरात्तव विभागाने तात्पुरती औरंगजेब कबर पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT