Fir Filed Against Cm Eknath Shindes Rally In Aurangabad News
Fir Filed Against Cm Eknath Shindes Rally In Aurangabad News Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad : लाऊडस्पीकरच्या तक्रारीवरून शिंदे गट विरुद्ध पोलिस वाद वाढला..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या औरंगाबाद दौऱ्यात रात्री उशीरापर्यंत लाऊडस्पीकर वाजवल्या प्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. (Shivsena)त्यानंतर पोलिसांनी कार्यक्रमाचे आयोजक शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांना पोलिस स्टेशनला बोलावले होते. तिथे गेल्यानंतर पोलिस निरीक्षक दराडे आणि जंजाळ यांच्यात वादावादी झाली.

शिंदे व जंजाळ समर्थक मोठ्या संख्येने पोलिस स्टेशनसमोर जमल्यामुळे तणाव वाढला होता.(Eknath Shinde) पोलिस निरीक्षक दराडे यांनी आपल्याला शिवीगाळ केल्याचा आरोप जंजाळ यांनी केला. (Aurangabad) हे प्रकरण अधिक चिघळू नये यासाठी सहायक पोलिस आयुक्तांकडून याची चौकशी केली जाणार असून पोलिस आयुक्त निखील गुप्ता हे स्वतः या संदर्भात माहिती घेणार आहेत.

दरम्यान, दोन दिवसांत या संदर्भात पोलिसांकडून योग्य चौकशी आणि कारवाई केली जाणार आहे. त्यानंतर आम्ही पुढची भूमिका ठरवू असे जंजाळ यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले. मुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद दौऱ्यात क्रांती चौकातील कार्यक्रमात रात्री उशीरापर्यंत लाऊड स्पीकरवर भाषण केले होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात क्रांती चौक पोलीस स्टेशनमध्ये आनंद कस्तुरे नावाच्या व्यक्तीने न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाल्याची तक्रार दाखल केली होती.

त्यानंतर आज पोलीस निरीक्षक दराडे यांनी शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांना फोन करून तुमच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे, पोलिस स्टेशनमध्ये या असे सांगितले होते. यावर जंजाळ यांनी रात्री १२ वाजेपर्यंत माईक चालू ठेवल्याचा तुम्ही गुन्हा दाखल करताय, पण तुमच्याच पोलिस स्टेशनच्या हद्दीत पहाटे चार वाजता अनेक भोंगे वाजत असतात, त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, ही सामान्य नागरिक म्हणून माझी भावना असल्याचे जंजाळ म्हणाले.

यावर संतापलेल्या दराडे यांनी तुम्ही आम्हाला शिकवू नका असे म्हणत शिवीगाळ केल्याचा आरोप जंजाळ यांनी केला. त्यामुळे जंजाळ विरुद्ध पोलिस निरीक्षक असा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान आता यामध्ये स्वतः पोलिस आयुक्त लक्ष घालणार असल्यामुळे तुर्तास हा वाद थांबला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT