Shivsena Leader Chandrakant Khiare News Aurangabad
Shivsena Leader Chandrakant Khiare News AurangabadSarkarnama

गेलात ना..आता शिंदेची तळी उचला ; आमच्या नेत्यांबद्दल बोललेलं सहन करणार नाही..

तो तानाजी सावंत म्हणतो मी आदित्यला ओळखत नाही, रात्रंदिवस त्यांच्या मागे फिरत होता, आता ओळखत नाही. पण ही गुर्मी पैशाची मस्ती जास्त दिवस चालत नाही. (Chandrakant Khaire)
Published on

औरंगाबाद : शिवसेनेशी गद्दारी करायची, पुन्हा आमच्या नेत्यांविरुद्ध काहीही बोलायचं हे आता आम्ही सहन करणार नाही. उठसूठ उद्धव साहेब, आदित्य ठाकरे यांच्यावर टीका कशासाठी करता. (Shivsena) आता गेलात ना तिकडे, केली ना गद्दारी मग शांत बसा, शिंदेंची तळी उचला अशा शब्दात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी उदय सामंत यांच्यावर काल झालेल्या हल्ल्याबद्दल प्रतिक्रिया दिली.

हल्ल्याच्या समर्थन करणार नाही, पण हल्ले का होतायेत याचा देखील त्यांनी विचार केला पाहिजे. आमच्या नेत्यांवर टीका कराल तर मग आमची अक्कल गुडघ्यात असते, आम्ही काहीही करतो, असा दम देखील खैरे यांनी भरला. (Marathwada) माजीमंत्री व शिंदे गटात सहभागी झालेले उदय सामंत यांच्या गाडीवर काल पुण्यातील कात्रज चौकात हल्ला झाला. त्यानंतर शिवसेना आणि शिंदे गटाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटायला लागल्या आहेत.

शिंदे गटाकडून जशासतसे उत्तर देण्याची भाषा केली जात आहे, तर शिवसेनेकडून आमच्या नेत्यांविरुद्ध बोलाल तर गप्प बसणार नाही, असा इशारा दिला जातोय. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी देखील बंडखोर आमदारांना सुनावले. खैरे म्हणाले, हल्याचे समर्थन करणार नाही, पण हे हल्ले का होतात ? याचा देखील त्यांनी विचार केला पाहिजे. कोणीही उठतो उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करतो.

Shivsena Leader Chandrakant Khiare News Aurangabad
मोदीजी तुम्ही बोफोर्स तोफे पेक्षाही जास्त फेकता, पंतप्रधान आवास योजनेवरून एमआयएमची टीका..

तो तानाजी सावंत म्हणतो मी आदित्यला ओळखत नाही, रात्रंदिवस त्यांच्या मागे फिरत होता, आता ओळखत नाही. पण ही गुर्मी पैशाची मस्ती जास्त दिवस चालत नाही, तुमच्याही मागे कधीतरी ईडी लागेल, असा इशाराही खैरे यांनी यावेळी दिला. जे आमदार शिंदे यांच्यासोबत गेलेत त्यांनी आता शांत बसावे, उगाच आमच्या नेत्यांवर टीका करू नये, अन्यथा शिवसैनिक पेटून उठेल, असा इशाराही खैरे यांनी यावेळी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com