Dr.Babasaheb Ambedkar Marathwada University News Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad : विद्यापीठ सिनेट निवडणुकीत राष्ट्रवादीचे एकहाती वर्चस्व ; १८ पैकी १५ जागा जिंकल्या..

BAMU : पहिल्या टप्प्यात अधिसभा पदवीधर गटात विद्यापीठ उत्कर्ष पॅनलने १० पैकी ९ जागांवर विजय मिळवला

सरकारनामा ब्युरो

University News : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट) अध्यापक, व्यवस्थापन प्रतिनिधी, विद्यापीठ अध्यापक गटाच्या निवडणूकीत मराठवाडा पदवीधर राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखालील उत्कर्ष पॅनलने एकहाती वर्चस्व मिळवले आहे. NCP १८ पैकी १५ जागांवर विजय मिळवत विद्यापीठाच्या राजकारणात राष्ट्रवादीने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या (Marathwada) अधिसभा (सिनेट) अध्यापक, व्यवस्थापन प्रतिनिधी, विद्यापीठ अध्यापक, विद्यापरिषद गटाची निवडणूक १० डिसेंबर रोजी झाली होती. (Aurangabad) आज निकाल जाहीर करण्यात आला तेव्हा व्यवस्थापन प्रतिनिधी गटाच्या ६ जागेसाठी झालेल्या निवडणूकीत विद्यापीठ उत्कर्ष पॅनलचे एस.टी.प्रवर्गातील उमेदवार नितीन जाधव बिनविरोध निवडून आले.

तर खुल्या प्रवर्गातून डॉ. मेहेर पाथ्रीकर, गोविंद देशमुख, अश्लेष मोरे विजयी झाले. त्यांना अनुक्रमे 33, 32 व 28 मते मिळाली. प्राचार्य गटात ९ जागेसाठी झालेल्या निवडणूकीत उत्कर्षचे एस.टी.प्रवर्गातील उमेदवार डॉ. शिवदास शिरसाठ बिनविरोध निवडून आले तर एस.सी. प्रवर्गातून डॉ. गौतम पाटील ४६ मते, व्हीजेएनटी प्रवर्गातून डॉ.गोवर्धन सानप ५२ मते, खुल्या प्रवर्गातून डॉ.बाबासाहेब गोरे १५ मते, डॉ. भारत खंदारे १४ मते, डॉ. विश्वास कंधारे १३ मते, डॉ.संजय कोरेकर १३ मते, डॉ.दादा शेंगुळे ९ मते घेऊन विजयी झाले.

विशेष म्हणजे प्राचार्य गटातील खुल्या प्रवर्गातील पाच पैकी पाच जागांवर उत्कर्ष पॅनलने बाजी मारली. विद्यापीठ अध्यापक गटात उत्कर्ष पॅनलचे खुल्या प्रवर्गातील उमेदवार डॉ.भास्कर साठे ६० एस.सी.प्रवर्गातील डॉ.चंद्रकांत कोकाटे ६५ मते घेऊन मोठ्या फरकाने विजयी झाले. तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचाचे संस्थाचालक गटाचे उमेदवार, बसवराज मंगरुळे हे पहिल्या फेरीतच विजयी झाले.

संस्थाचालक महिला गटामध्ये अर्चना आडसकर या बिनविरोध निवडून आल्या तर विद्यापीठ पीजी टीचर गटामध्ये प्रा. डाॅ. वैशाली खापर्डे या विजयी झाल्या आहेत. कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यात आले. अधिसभा शिक्षक व विद्यापरिषद गटाची मतमोजणी सुरू असल्याने त्याचे निकाल रात्री उशिरापर्यंत येतील. पहिल्या टप्प्यात अधिसभा (सिनेट) पदवीधर गटात विद्यापीठ उत्कर्ष पॅनलने १० पैकी ९ जागांवर विजय मिळवला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT