Raj Thackeray
Raj Thackeray Sarkarnama
मराठवाडा

राज ठाकरे यांना औरंगाबाद पोलिसांची नोटीस

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना औरंगाबाद (Aurangabad) पोलिसांनी नोटीस बजावली आहे. औरंगाबादमध्ये १ मे रोजी झालेल्या सभेत राज ठाकरे यांच्याकडून काही अटींचा भंग झाला आहे, त्याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपपत्र दाखल करताना ठाकरे यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. औरंगाबाद पोलिसांनी स्पीड पोस्टद्वारे ही नोटीस ठाकरे यांना पाठवली आहे. (Aurangabad police notice to Raj Thackeray)

काही अटी आणि शर्ती घालूनच राज ठाकरे यांना १ मे रोजी सभेची परवानगी देण्यात आली होती. मात्र, त्यांच्याकडून काही अटींचे उल्लंघन झाले होते, त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे औरंगाबाद पोलिसांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, या प्रकरणी औरंगाबादच्या पोलिस उपायुक्त उज्जवला बनकर म्हणाल्या की, औरंगाबादमध्ये १ मे रोजी राज ठाकरे यांची जी सभा झाली होती, त्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, त्याअनुषंगानेच ही नोटीस बजावण्यात आलेली आहे. त्या प्रकरणाचा तपास करण्यात आलेली आहे. चार्जशीटच्या अनुषंगाने ४१ (१) अन्वये ही नोटीस राज ठाकरे यांना देण्यात आली आहे.

औरंगाबादमधील सभेतील अटीच्या उल्लंघनप्रकरणी खटला दाखल झाला आहे. याची माहिती या नोटिसीद्वारे राज ठाकरे यांना बजावण्यात आलेली आहे. न्यायालयाकडून जी तारीख सुनावण्यासाठी देण्यात येईल, त्या तारखेला त्यांना न्यायालयात हजर राहावे लागेल. ज्या प्रकरणात सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा असते, तसेच ज्या गुन्ह्यात संशयित आरोपीला अटक करणे आवश्यक नाही, अशा गुन्ह्यात आम्ही आरोपीला ४१ (१) अन्वये नोटीस पाठविण्यात येते, असेही बनकर यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT