Central Minister Amit Saha-Devendra Fadanvis Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad : राजसभा झाली, उद्धव ठाकरे येणार ; भाजपनेही केली अमित शहांना आणण्याची तयारी..

२३ मे रोजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून पाणी प्रश्न अधिक पेटवणार एवढे निश्चित. एवढ्यावरच न थांबता भाजपने २८ व २९ मे रोजी प्रदेश कार्यकारणीच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे.( Bjp)

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : महापालिका निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नसल्या तरी पाणी प्रश्नावरुन शिवसेनेची पुरती कोंडी करण्याची रणनिती भाजपने आखली आहे. (Aurangabad) स्थानिक आमदार, पदाधिकाऱ्यांनी पाण्यासाठी आंदोलन करत तयारी सुरू केल्यानंतर आता माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या नेतृत्वाखाली २३ मे रोजी औरंगाबादेत पाणी प्रश्नावर प्रचंड मोर्चा काढण्यात येणार आहे.

एवढ्यावरच न थांबता ज्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर शिवसेनेची कोंडी करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा झाली, त्याच मैदानावर उद्धव ठाकरे यांच्या ८ जूनला सभा होणार आहे. तत्पुर्वीच देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Saha) यांची त्याच मैदानावर सभा घेण्याची तयारी भाजपने चालवली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

फडणवीस यांच्या पाणी प्रश्नावरील मोर्चानंतर लगेच २८ आणि २९ मे रोजी भाजप प्रदेश कार्यकारणीची महत्वाची बैठक औरंगाबादेत होणार आहे. ही बैठक झाल्यानंतर अमित शहा यांची सभा मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर घेण्याचा भाजप नेतृत्वाचा प्रयत्न आहे. आगामी औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूममीवर भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

शहरातील नागरिकांना ८ दिवासाआड मिळणारे पाणी हाच प्रचाराचा प्रमुख मुद्दा करत भाजप याचे खापर शिवसेनेच्या माथी फोडण्याच्या तयारीत आहे. या दृष्टीने स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांनी आंदोलने, निदर्शने करत वातावरण तापवण्यास सुरूवात केली आहे.

यावर आता २३ मे रोजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाकाडून भाजप पाणी प्रश्न अधिक पेटवणार एवढे मात्र निश्चित. तर एवढ्यावरच न थांबता भाजपने २८ व २९ मे रोजी शहरातील संत एकनाथ रंग मंदिरात प्रदेश कार्यकारणीच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक देखील बोलावली आहे.

या बैठकीनंतर राज ठाकरे यांची सभा झालेल्या आणि उद्धव ठाकरे यांची होणाऱ्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा घेण्याचे प्रयत्न भाजपकडून युद्धपातळीवर सुरू आहेत. एकंदरित भाजपने महापालिका निवडणुकीचे रणशिंगच या निमित्ताने फुंकल्याचे दिसते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT