Chandrakant Khaire-Ambadas Danve
Chandrakant Khaire-Ambadas Danve Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad : कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर शिवसेनेची पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठक

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : गेल्या काही महिन्यांपासून शहरात खून, हाणामाऱ्या आणि चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. (Shivsena) तीन दिवसांत पाच खून विविध भागात झाल्याने शहरातील नागिरकांमध्ये भितीचे वातावरण आहे. महाविद्यालयीन तरुणीपासून ज्येष्ठ दाम्पत्यांच्या हत्येने शहर अक्षरशः हादरून गेले आहे. (Aurangabad) कायदा व सुवव्यस्था अधिक कडक करण्याचा दृष्टीने काही उपाययोजना तातडीने करणेचे गरजेचे असल्याचे सांगत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज पोलिस आयुक्त कार्यालयात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतली.

यावेळी झालेल्या बैठकीत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे व शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी अनेक सूचना केल्या. या बैठकी संदर्भात प्रसार माध्यमांना माहिती देतांना चंद्रकांत खैरे म्हणाले, शहरातील कायदा व सुव्यवस्था सध्या चिंतेचा विषय बनली आहे. (Police Commissinoer) गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या खूनाच्या घटना, वाढलेले नशेखोरीचे प्रमाण, आॅनलाईन औषधींचा पुरवठा यातून साधरणात १८ ते २५ वर्ष वयोगटातील तरूणांकडून अशा प्रकारची गुन्हेगारी कृत्य घडत आहेत.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्यामुळे हे कुठे तरी थांबले पाहिजे, लोकांच्या मनातील भिती नाहीसी होऊन त्यांना मुक्तपणे वावरता आले पाहिजे, यासाठी आम्ही पोलिस आयुक्तांची भेट घ्यायला आलो होतो. परंतु पोलिस आयुक्त पुर्वनियोजित रजेवर असल्यामुळे शहरातील तीन्ही पोलिस आयुक्त व इतर अधिकाऱ्यांसोबत आमची बैठक झाली. या बैठकीत सर्व पोलिस ठाण्यातील गुन्ह्यांची इत्यंभूत माहिती पोलिसा आयुक्तापंर्यंत रोजच्या रोज पोहचली पाहिजे, बऱ्याचदा कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून खोटी माहिती आयुक्तांना पुरवली जाते, त्यामुळे योग्य कारवाई किंवा तपास होत नाही आणि गुन्हेगारांना मोकळे रान सुटते.

याशिवाय नशेखोरीचे प्रमाण तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या नशेतूनच खून, हत्या, बलात्कारासारखे प्रकार घडत आहेत. काही खून हे वैयक्तिक कारणांमधून झाले असले तरी असे का घडते याचा शोध घेणे गरजेचे आहे. अवैध दारू, नशेच्या गोळ्यांवर पोलिसांनी लगाम घातला पाहिजे. महाविद्यालय परिसरातील कॅफे बंद झाले पाहिजे, महाविद्यालयातच संस्थेने कॅन्टीन सुरु केले तर देवगिरी महाविद्यालय परिसरात जो प्रकार घडला तसे प्रकार घडणार नाही. कॅन्टीनवर महाविद्यालयाचा कंट्रोल असला पाहिजे, अशी सूचना आम्ही केल्याचे खैरे म्हणाले.

शहरात सर्रास ट्रिपलसीट वाहने चालवणाऱ्यांचे आणि त्यातून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांनी याला तातडीने पायबंद घातला पाहिजे. दिल्ली प्रमाणे शहरात राहणाऱ्या प्रत्येक भाडेकरूची संपुर्ण माहिती पोलिसांना देणे बंधनकारक केले पाहिजे. जेणेकरून एखादी बाहेरची व्यक्ती गुन्हा करून पळून गेली तर त्याचा शोध घेणे सोपे जाईल. अशा अनेक सूचना बैठकीत पोलिसांना देण्यात आल्या आहेत. या सर्व प्रकारांना लवकरच आळा घाऊन कायदा व सुव्यवस्था मजबुत करण्याचे आश्वासन पोलिस अधिकाऱ्यांनी दिले असल्याचेही खैरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT