ED chargesheet : अनेकदा समन्स पाठवूनही मलिक यांची पत्नी, मुलगा चौकशीसाठी गैरहजर

नवाब मलिक यांच्या पत्नीला दोन वेळा, तर मुलगा फराज यांना पाच वेळा समन्स पाठविले होते.
Nawab Malik
Nawab MalikSarkarnama
Published on
Updated on

मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मंत्री नवाब मलिक (Nawab Malik)हे सध्या सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)ने दाखल केलेल्या मनी लाँन्ड्रिग प्रकरणामध्ये अटकेत आहेत. त्यांच्याबाबत ईडीने (ed) दाखल केलेल्या आरोपपत्रात (ED chargesheet)अनेक धक्कादायक माहिती ईडीने विशेष न्यायालयाकडे दिली आहे. याबाबतचे वृत्त 'एएनआय'ने दिलं आहे. (nawab malik latest news)

नवाब मलिकांच्या प्रकरणात ईडी कडून त्यांच्या पत्नीला 5 वेळेस आणि मुलाला 2 वेळेस समन्स पाठवण्यात आले होते. पण ते चौकशीसाठी आले नसल्याचे चार्जशीटमध्ये सांगण्यात आले आहे. नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम ( Daud Ibrahim )यांच्यासोबत असलेल्या संबधांबाबत आपल्याकडे भक्कम पुरावे असल्याचे ईडीनं मंगळवारी न्यायालयात सांगितले.

मलिक यांचे दोन मुले, आणि पत्नीला चौकशीसाठी ईडीनं बोलविलं होते. पण ते उपस्थित राहिले नाहीत, ते मनमानी करीत असल्याचा आरोप ईडीनं आरोपपत्रात केला आहे.

ईडीने मलिकांच्या 2 मुलांना आणि पत्नीला चौकशीसाठी बोलावले होते परंतु तिन्ही पैकी कोणीही हजर झाले नाही. मलिक यांच्या पत्नी मेहजबीन मलिक यांना दोनदा समन्स बजावले होते, मात्र त्या तपासासाठी हजर झाल्या नाहीत. फराज मलिक (नवाब मलिकाचा मुलगा) याला 5 वेळा समन्स बजावण्यात आले होते, मात्र तो तपासात हजर झाला नाही. अमीर मलिक (मुलगा) याला तीनदा समन्स पाठवले गेले मात्र तोही चौकशीसाठी हजर झाला नाही, अशी माहिती ईडीनं आरोपपत्रात दिली आहे.

Nawab Malik
संजय राऊत अडचणीत ; सोमय्यांनी केला शंभर कोटींचा मानहानीचा दावा

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा भाचा अलीशाह पारकर ( Alishah Parkar ) याचा ईडीने काही दिवसांपूर्वी मनी लाँन्ड्रिग प्रकरणात जबाब नोंदवला होता. त्यावेळी त्याने ईडीला माहिती दिली. त्यामुळे मलिक यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

Nawab Malik
राष्ट्रवादीच्या बैठकीत शिवसेनेविरुद्ध तक्रारी ; पुढील आठवड्यात इम्पिरिकल डेटा देणार

अलीशाह पारकर (Alishah Parkar) हा कराचीत राहतो. ईद तसेच दिवाळीच्या सणांना मामा दाऊद इब्राहिम ( Daud Ibrahim ), त्याची पत्नी महजबिन (Mahjabin) हे माझी पत्नी आयशा आणि माझ्या बहिणीशी संपर्क करतात, असे त्याने काही दिवसापूर्वी ईडीला सांगितले होते.

ईडीनं आरोपपत्रात म्हटलं आहे की..

  • दाऊद हा भारतातील त्याचा भाऊ इक्बाल कासकरसह अन्य नातेवाईक आणि भारतातले 'डी कंपनी'तील दाऊदचे खास हस्तकांना महिन्याला लाखो रुपये पाठवले जात होते.

  • मनी लाँन्ड्रिग प्रकरणात साक्षीदार असलेल्या खालिद उस्मान शेख यांच्या चौकशीतून ही बाब समोर आली आहे.

  • खालिद हा इक्बाल कासकरचा लहानपणीचा जवळचा मित्र असलेल्या अब्दुल सदमचा लहान भाऊ आहे

  • ७ डिसेंबर रोजी अब्दुलची गवळी टोळीकडून हत्या करण्यात आली होती. यावेळी इक्बाल कासकर हा दुबईत होता.

  • अब्दुलच्या हत्येची महिती मिळताच इक्बाल हा मुंबई येऊन अब्दुलच्या घरी त्याच्या कुटुंबियांचे सांत्वन करायला गेला होता.

  • त्यानंतर ज्या ज्यावेळी इक्बाल अब्दुलचे भाऊ खालिद आणि त्याचा लहान भाऊ शब्बीर याला बोलवायचा हे दोघंही त्याला भेटायला जायचे.

  • अशाच एका भेटीत इक्बालने दाऊदकडून दर महिन्याला जवळच्या नातेवाईंकाना व हस्तकांना दाऊद १० लाख पाठवत असल्याचे इक्बालने सांगितल्याचा खुलासा खालिदने ईडीच्या चौकशीत केला आहे

  • डी कंपनी भारतातील हस्तकांना पैसे पुरवत असल्याची माहिती नुकतीच NIA च्या एका कारवाईतूनही समोर आली होती

  • NIA ने अटक केलेल्या आरीफ शेख आणि शब्बीर शेख या दोघांची कस्टडी मागताना, यातील आरीफ शेख याच्या घरातून ५ लाखाची रोकड NIA ने जप्त केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com