Shivsena-Bjp-Mns Leadar Came together in Aurangabad
Shivsena-Bjp-Mns Leadar Came together in Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad : श्रीरामाने शिवसेना-भाजप-मनसेला एकत्र आणले..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : हिंदुत्वाच्या मुद्यावरून एकमेकांना डिवचणारे, तुमचे हिंदुत्व बेगडी, आमचे श्रेष्ठ असा दावा करणारे आणि स्वःला हिंदुत्ववादी म्हणणारे शिवसेना-भाजप आणि मनसे हे तीनही पक्ष आज एकत्र आल्याचे पहायला मिळाले. (Shivsena) निमित्त होते श्रीराम नवमीचे. रामनवमीचा उत्सव शहरात दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो. (Bjp) किराडपुरा भागातील श्रीराम मंदिरात रामजन्मोत्सवाचा सोहळा मोठ्या थाटात पार पाडला जातो. (MNS)

शिवसेना-भाजप हे दोन पक्ष गेल्या कित्येक वर्षांपासून एकत्रितपणे हा जन्मोत्सव साजरा करत होते. परंतु गेल्या दोन अडीच वर्षात राज्यात घडलेल्या घडामोडी आणि सत्तांतरानंतर हे दोन्ही पक्ष आता एकमेकांचे पक्के वैरी झाले आहेत. काॅंग्रेस-राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन केल्यापासून सातत्याने भाजपकडून शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थिती केले गेले. (Marathwada)

शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली आहे, त्यांनी हिंदुत्व गुंडाळून ठेवले असा आरोप देखील केला जात आहे. यात भर पडली ती राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचीही. गेल्या अडीच वर्षापासून शहरात शिवसेना विरुद्ध भाजप-मनसे असे चित्र पहायला मिळते. त्यामुळे या दोन्ही पक्षाकडून नहेमीच औरंगाबादचे संभाजीनगर, चिकलठाणा विमानतळाच्या नामकरणाचा विषय, हिंदुत्व यावरून शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतात.

अगदी गुडीपाडव्या निमित्त शिवसेने नेते चंद्रकांत खैरे यांनी आयोजित केलेल्या शोभायात्रेकडे निमंत्रण देऊनही भाजप व मनसेने पाठ फिरवली होती. परंतु आज श्रीराम नवमी निमित्त एक चांगले चित्र शहरात पहायला मिळाले. हिंदुत्वावरून एकमेकांना डिवचणारे शिवसेना-भाजप आणि मनसेचे नेते राम जन्मोत्सवासाठी एकत्र आले होते.

एकमेकांच्या शेजारी उभे राहून त्यांनी जन्मोत्सव सोहळा साजरा केला आणि सामुहिक आरती देखील केली. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे, भाजपचे आमदार अतुल सावे, मनसेचे शहर-जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर व या तीनही पक्षांचे नेते,पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने रामजन्मोत्सव सोहळ्याला उपस्थिती होते. परंतु हा जन्मोत्सव सोहळा संपल्यानंतर पुन्हा हे तीन्ही पक्ष एकमेकांवर आरोप आणि टीका करतांना दिसतील हा भाग निराळा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT