राज ठाकरेंनी मोदीचं कैातुक केलं तरी यांच्या पोटात दुखतं ; दानवेंचा विरोधकांना टोला

''नरेंद्र मोदींवर राज ठाकरेंनी टीका केली तर काही जणांना बरं वाटतं,'' असा टोला विरोधकांचे नाव न घेता दानवेंनी लगावला.
Raosaheb Danve
Raosaheb Danvesarkarnama

मुंबई : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve)यांनी दोन दिवसापूर्वी मुंबईत शिवतीर्थ या मनसेचे (MNS)अध्यक्ष राज ठाकरेंच्या (Raj Thackearay)निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली.

या भेटीत दानवे आणि राज ठाकरे यांच्यात काय चर्चा झाली? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. दानवेंनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या भेटीबाबत सांगितले.

रावसाहेब दानवे म्हणाले, ''राज ठाकरे यांनी मला फोन करुन बोलावले होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचं कैातुक केलं. नातू झाल्यानंतर त्यांनी मला पेढे दिले,'' 'नरेंद्र मोदींवर राज ठाकरेंनी टीका केली तर काही जणांना बरं वाटतं,'' असा टोला विरोधकांचे नाव न घेता दानवेंनी लगावला.

Raosaheb Danve
धक्कादायक : पोलीस ठाण्यातच महिला पोलीस असुरक्षित ; हवालदारानेच केला विनयभंग

येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-मनसे यांच्यात युती होईल का, याबाबत सध्या चर्चा रंगल्या आहेत. याबाबत दानवेंना विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी सूचक उत्तर दिले आहे.

दानवे म्हणाले, ''सर्वच पक्षांना मित्रांची गरज असते. मनसेनं परप्रातींयाबाबतची आपली भूमिका बदलली तर युती शक्य आहे. काळाच्या पोटात काय दडलयं माहित नाही,'' 'राज ठाकरेंनी मोदीचं कैातुक केलं तरी यांच्या पोटात दुखतं,'' असा टोला दानवेंचा विरोधकांना लगावला.

Raosaheb Danve
तृप्ती देसाई करणार 'त्या' कीर्तनकाराचा भांडाफोड ; अश्लील व्हिडिओ व्हायरल

''झोपडपट्टी हटाव आणि पुर्नवसन या मुद्द्यांवर त्यांची राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली,'' असे दानवेंनी सांगितले. मुंबई सारख्या महानगरांमध्ये रेल्वेच्या जागेवर काही झोपडपट्ट्या आहेत. या झोपडपट्ट्या हटवण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार झोपडपट्टीधारकांना नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. झोपडपट्टी हटवू नये अशी अनेकांची इच्छा आहे. यासंदर्भात सर्व राजकीय पक्षांनी दानवेंकडे मागणी केली.

मनसेचे निवडणूक चिन्ह हे रेल्वे इंजिन आहे, त्याच रेल्वे खात्याचे दानवे हे राज्यमंत्री आहेत. त्यांनी राज ठाकरे यांना रेल्वे ईंजिनाची प्रतिकृती भेट दिली. त्यांच्या या अनोख्या भेटीची देखील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. शिवाजी पार्कवर राज ठाकरे यांनी गुडीपाडव्या निमित्त केलेल्या भाषणामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com