Guardian Minister Bhumre Speech In Aurangabad News. Sarkarnama
मराठवाडा

Bhumre : जिल्ह्याला इतके मंत्री झालेत, की गाड्या कमी पडतायेत..

अब्दुल सत्तार, अतुल सावे, संजय शिरसाट या सगळ्यांनीच प्रयत्न केले. २२ वर्षानंतर जिल्ह्याला स्थानिक पालकमंत्री मिळाला आहे. त्याचा फायदा निश्चितच जिल्ह्यातील जनतेला करून देण्याचा माझा प्रयत्न राहील. (Sandipan Bhumre)

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : राज्यात आपला जिल्हा खरचं नशीबवान आहे. राज्य सरकारमध्ये तीन कॅबिनेट मंत्री, केंद्रात दोन मंत्री अन् विधान परिषदेतील विरोधी पक्षनेताही आपलाच आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी जे काही करता येईल ते करू. (Aurangabad) एकाच जिल्ह्यात एवढे मंत्री होण्याचा हा आतापर्यंतच पहिलाच योग असेल, एवढे मंत्री झाले की त्यांना गाड्या कमी पडतायेत. पण तुम्ही मला पालकमंत्री केलं, त्यामुळे मी गाड्या संदर्भात लवकरच निर्णय घेईल, असे पालकमंत्री संदीपान भुमरे (Guardian Minister) यांनी स्पष्ट केले.

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या वतीने नवनिर्वाचित मंत्र्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, राज्याचे (Abdul Sattar) कृषीमंत्री अब्दुल सत्तार, सहकार मंत्री अतुल सावे, रोहयो तथा पालकमंत्री संदीपान भुमरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

जिल्ह्याला केंद्रात आणि राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिनिधीत्व मिळाले आहे, त्यातून शेतकऱ्यांसाठी काही चांगले निर्णय आपण घेऊ. जिल्हा मध्यवर्ती बॅंक अडचणीतून बाहेर आली असली तरी अनिष्ठ तफावतीचा मुद्दा कायम आहे. दिवंगत विलासराव देशमुख मुख्यमंत्री असतांना त्यांनी लातूर जिल्हा बॅंक अनिष्ठ तफावतीतून बाहेर काढली होती. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असतांना त्यांनी देखील अशाच पद्धतीने नांदेड जिल्हा बॅंक वाचवली होती.

आता आपण जिल्ह्यात पाच मंत्री, विरोधी पक्षनेता असे सहाजण आहोत, असा योग पुन्हा कधी येणार नाही. या संधीचा फायदा घेऊन आपण सगळे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ आणि या बॅंकेची देखील अनिष्ठ तफवातीतून सोडवणूक करू, असे आवाहन देखील त्यांनी उपस्थितीत मंत्र्यांना केले. अनेक माझ्यासह अब्दुल सत्तार, विरोधी पक्षनेते बॅंकेचे संचालक आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवून त्यांनी जितकी मदत करणे शक्य होईल ती आपण केली पाहिजे.

महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेतून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे अनुदान दिवाळीपुर्वी मिळेल, असे आश्वासन देखील भुमरे यांनी यावेळी दिली. मला पालकमंत्री करण्यासाठी अब्दुल सत्तार, अतुल सावे, संजय शिरसाट या सगळ्यांनीच प्रयत्न केले. २२ वर्षानंतर जिल्ह्याला स्थानिक पालकमंत्री मिळाला आहे. त्याचा फायदा निश्चितच जिल्ह्यातील जनतेला करून देण्याचा माझा प्रयत्न राहील, अशी ग्वाही देखील भुमरे यांनी यावेळी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT