Bharat Jodo Yatra Maharashtra News, Nanded
Bharat Jodo Yatra Maharashtra News, NandedSarkarnama

Nanded : `भारत जोडो` देगलूर मार्गे महाराष्ट्रात, स्वागतासाठी चव्हाणांनी कंबर कसली..

यात्रेच्या पूर्वतयारीसाठी आज नांदेड येथे जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. (Congress,Bharat Jodo Yatra)
Published on

नांदेड : काॅंग्रेसचे नेते राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या चांगलीच गाजते आहे. राहूल गांधी यांची कित्येक किलोमीटरची पायपीट आणि त्यात सर्वसामान्यांना सोबत घेत ढवळून काढलेले वातावरण हे याचे वैशिष्ट ठरत आहे. (Congress) ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे.

तामिळनाडूतील कन्याकुमारी पासून सुरू झालेल्या या भारत जोडो यात्रेचा प्रवास केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, (Maharashtra) महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, हरयाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि पंजाब असा असणार आहे. (Rahul Gandhi) ही यात्रा महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्याचा पहिल्या आठवड्यात साधरणतः ५ तारखेला दाखल होण्याची शक्यता आहे.

नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करेल. जाती-धर्मात व समाजात फूट पाडणारे राजकारण संपवून देशाला एकजूट करणे हा यात्रेचा उद्देश असल्याचे सांगितले जाते. राहूल गांधी यांच्या या मोहिमेला देशभरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतो आहे.

लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत समाजातील प्रत्येक घटक या यात्रेत सहभागी होतांना दिसतो आहे. राहूल गांधी यांचा या यात्रेतील साधेपणा सगळ्यांनाच भावत असल्याने महाराष्ट्रात देखील भारत जोडो यात्रेचे असेच जल्लोषात आगमन झाले पाहिजे, यासाठी माजी मंत्री व काॅंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.

Bharat Jodo Yatra Maharashtra News, Nanded
`तो` ठेकेदार पाचशे कोटीचे काम अर्ध्या किंमतीत कसे करणार ? गडकरीजी उत्तर द्या..

नांदेड जिल्ह्यातील देगलूरमधून भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. यात्रेच्या पूर्वतयारीसाठी आज नांदेड येथे जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. प्रमुख नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांची यावेळी मोठी उपस्थिती होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com