Unseasoal Rain Alart News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad : सतर्कतेचा इशारा, चार-पाच दिवसांत ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता

सरकारनामा ब्युरो

Unseasoal Rain News : हवामानातील बदलामुळे येत्या चार-पाच दिवसांत औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील अन्य ठिकाणी मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. Rainfall हवामान खात्याच्या माहितीनूसार बंगालच्या उपसागरावर मॅन-डीस चक्रीवादळ गेल्या सहा तासांमध्ये १० किमी प्रतितास वेगोने वायव्य दिशेला केंद्रस्थानी आहे. तर ९ डिसेंबर पासुन दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरावरील पंडुचेरीच्या किनाऱ्यापासुन जवळजवळ वायव्येकडे सरकुन ८५ किमी प्रतितास वेगोने उत्तर तामिळनाडू ओलांडण्याची दाट शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (Farmers) शेतकऱ्यांनाही पिकांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाकडून या संदर्भात एक पत्रक जारी करण्यात आले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानूसार १० डिसेंबर पासुन चार-पाच दिवसांत औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यासह इतर ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम ते हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता पाहता शेतकऱ्यांनी पिके मळणी आणि कापणीसाठी तयार असतील अशी पिके सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. फळे, भाजीपाला, शेती पिकांची सुरक्षित ठेवण करावी. जनावरे देखील सुरक्षित ठिकाणी बांधावेत.अतिवृष्टीमुळे सकल भागात काही प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता आहे.

गडगडाटी वाऱ्यासह पाऊस पडत असतांना नागरिकांनी मोकळया भागात थांबू नये. विजेचे खांब, झाडे इत्यादी ठिकाणी उभे राहू नये. विद्युत उपकरणांपासुन दुर रहावे, शक्यतो मच्छिमारांनी मासेमारीसाठी तलाव अथवा नदीत जाऊ नये. शेतकरी बांधवानी विजेचा गडगडाट होत असल्यास शेतीकाम करणे टाळुन सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा,अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

आधीच अतिवृष्टी, सततचा, परतीच्या पावसामुळे शेतकरी अडचणीत आहे. अजूनही सरकारी मदत, पीक विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळालेली नाही. अशातच आता पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा दिल्यामुळे शेतकरी अजूनच अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT