Marathwada : मोदींनी आधी सीमा प्रश्नावर भूमिका स्पष्ट करावी, मग समृद्धी महामार्गाचे लोकार्पण ..

Uddhav Thackeray : पंतप्रधान देशाचे पालक आहे, पण महाराष्ट्र हा पालकाची भाजी नाही, हे लक्षात ठेवा.
Uddhav Thackeray Speech News, Jalna
Uddhav Thackeray Speech News, JalnaSarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray News : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे समृद्धी माहामार्गाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी येत आहेत. PM Modi मात्र, मोदी यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर आपली स्पष्ट भूमिका जाहीर करावी, त्यानंतर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करावे, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले .

Uddhav Thackeray Speech News, Jalna
Marathwada : साहित्य संमेलनातही खोक्यांचीच चर्चा ; उद्धव ठाकरेंनी साधला निशाणा..

जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथेआयोजित ४२ वे मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन शनिवारी (ता.११) त्यांच्या हस्ते झाले. (Uddhav Thackeray) ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र हे देशाला शिकवण देणारे राज्य आहे. (Shivsena) सुरवातीपासून महाराष्ट्रच्या सीमा प्रश्नावर शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे. याच सीमा प्रश्नावर बाळासाहेब ठाकरे तीन महिने तुरुंगात गेले होते.

आज कर्नाटक सीमा भागात मराठी माणसावर अन्य होत असताना रविवारी (ता.११) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात येत असून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करणार आहेत. पंतप्रधान हे देशाचे पालक आहे, पण महाराष्ट्र हा पालकाची भाजी नाही, हे लक्षात ठेवा.

त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधी महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट करावी, त्यानंतर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करावे. ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महापुरुषां संदर्भात केलेल्या व्यकतव्यावरही टीका केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com