Devendra Fadanvis-Cm Uddhav Thackeray
Devendra Fadanvis-Cm Uddhav Thackeray Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad : जल `आक्रोश` मुख्यमंत्र्यांच्या कानावर ; मुंबईत तातडीची बैठक सुरू..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेला पाणी प्रश्नांवरून खिंडीत गाठण्याचा प्रयत्नात असलेल्या आणि त्यासाठी शहरात येऊन जल आक्रोश मोर्चा काढणाऱ्या भाजपचे दबाव तंत्र अखेर कामाला आले आहे. (Aurangabad) राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या जल आक्रोश मोर्चातील आक्रोश मुख्यमंत्र्यांच्या कानावर गेला असून आज मुंबईत खास औंरगाबादेतील पाणी प्रश्नावर मुंबईत बैठक बोलावण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या (Uddhav Thackeray) उपस्थितीत पाणीपुरवठा मंत्री, वरिष्ठ अधिकाऱ्यांची या बैठकीला उपस्थितीत असणार आहे. (Municipal Corporation) औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक आस्तीककुमार पांडेय हे आॅनलाईन या बैठकीला हजेरी लावणार आहेत. येत्या ८ जून रोजी औरंगाबादेत उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे.

तत्पुर्वीच सध्या शहरातील पाणी प्रश्नावर तोडगा काढून त्याची घोषणा सभेतून होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात भाजप-सेनेचे सरकार असतांना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरासाठी १६८० कोटींची पाणी योजना मंजुर केली होती. कालांतराने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आणि या योजनेत बदल करण्यात आले. या योजनेचे काम सुरू झाले असले तरी त्याची गती पाहता किमान दोन-अडीच वर्ष नागरिकांना पाणी मिळणार नाही, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

ज्या फडणवीसांनी पाण्यासाठी योजना मंजुर केली होती, त्यांनीच या प्रश्नावरून शिवसेनेला धारेवर धरत २३ मे रोजी शहरात जल आक्रोश मोर्चा काढला होता. या मोर्चाचा परिणाम म्हणा, की मग शिवसेनेकडून पाणी प्रश्नावर कायमचा तोडगा काढण्याच्या दृष्टीने म्हणा पण या विषयावर मुख्यमंत्र्यांनी स्वंतत्र बैठक बोलावली हे महत्वाचे आहे. आता या बैठकीतून काय तोडगा निघतो. औंरगाबादकरांना नियमित पाणी मिळते का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT