Rashid Mamu Uddhav Thackeray .jpg Sarkarnama
मराठवाडा

Shivsena UBT News: 'औरंगपुरा' चं 'संभाजीपेठ' नामांतर करण्याचा महापालिकेत प्रस्ताव, ठाकरेंच्या शिवसेनेचे रशीद मामू पडले एकाकी

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation : महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी माजी महापौर अब्दुल रशीद खान उर्फ मामू यांचा पक्षप्रवेश करून घेतला. यावरून खैरे विरुद्ध दानवे असा वाद निर्माण झाला होता

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation News : महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी माजी महापौर अब्दुल रशीद खान उर्फ मामू यांचा पक्षप्रवेश करून घेतला. यावरून खैरे विरुद्ध दानवे असा वाद निर्माण झाला होता. राजकीय खेळी आणि मुस्लिम मतांवर डोळा ठेवून हा निर्णय घेण्यात आला होता, असा आरोप विरोधकांनी केला होता. हिंदुत्ववादी विचार धारेला कायम विरोध करणाऱ्या मामूंची महापालिकेत आता गोची होऊ लागली आहे.

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी (ता.20) 'औरंगपुरा' भागाचे नामकरण 'संभाजीपेठ' असे करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. याला विरोध करत रशीद मामू यांनी इतर महापूरुषांचे नाव द्या, अशी मागणी केली. मामू कात्रीत सापडल्याचे दिसताच भाजपाचे नगरसेवकांनी त्यांची फिरकी घेत तुमच्या पक्षाचा या नावाला विरोध आहे का? अशी विचारणा केली. आपण अडकलो हे लक्षात आल्यानंतर नगरसेवक सचिन खैरे त्यांच्या मदतीला धावून आले.

संभाजीपेठ नावाला आमचा विरोध नाही, त्यामुळे प्रस्ताव मंजूर करा, अशी भूमिका घेत खैरे यांनी बाजू सावरली. शहरातील बाजारपेठेचा भाग असलेल्या औरंगपुरा भागाचे नामकरण संभाजीपेठ करावे, असा प्रस्ताव सोमवारच्या सभेत स्थायी समितीचे सभापती तथा नगरसेवक अनिल मकरिये यांनी ठेवला होता. त्याला ठाकरे सेनेचे रशीद मामू यांनी विरोध करत, शहरात अनेक मोठे नेते होऊन गेले असून, त्यांनी विकासात हातभार लावलेला आहे, त्यांचे नाव द्या.

छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या नावाने शहरे आहेत. महान पुरुषांची नावे गल्लीला देऊ नये, अशी भूमिका घेतली. त्यावर भाजप नगरसेवकांनी ठाकरे सेनेची कोंडी केली. मकरिये यांनी, या नावाला तुमचा विरोध आहे का, ते सांगा. हे खरंच 'उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे आहेत का? असा प्रश्न उपस्थित करत पक्षाने भूमिका मांडावी, अशी मागणी भाजप नगसेवक प्रमोद राठोड यांनी केली. यावर रशीद मा्मू त्या पक्षात अजून नवे आहेत, असा टोला लगावला.

रशीद मामू यांनी नावे सुचविली, त्यावर तुम्ही महापौर राहिलेले आहात, महापालिकेच्या सभागृहाचे कामकाज कसे चालते, यांची माहिती तुम्हाला नाही का, असेही वैद्य म्हणाले. वाद वाढत असतानाच, नगरसेवक सचिन खैरे यांनी प्रस्ताव मांडल्याबद्दल मकरिये यांचे अभिनंदन करत, अनेक वर्षांपासून शिवसैनिक या भागाला संभाजीपेठ म्हणतात. त्यामुळे हा प्रस्ताव मंजूर करावा, असे सांगत पाठिंबा दिला. अखेर महापौर राजूरकर यांनी प्रस्ताव मंजूर केल्याने वादावर पडदा पडला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT