Rashid Mamu On Sahar Shaikh : सहर शेख लहान बच्ची, तिला राजकारण कळत नाही; भेट झाली तर नक्की समजावेल! मुंब्रा वादात रशीद मामूंची उडी

Mumbra Political Controversy : ‘मुंब्रा हिरवा’ वादावर रशीद मामूंनी सहर शेख यांना भेट झाली तर समज देऊ, रंगांवरून राजकारण टाळा, सहर यांच्यासारख्या तरूणांनी शिक्षण व रोजगारावर आरक्षण यावर बोललं पाहीजे.
Former Aurangabad mayor Rashid Mamu addresses media, reacting to Sahar Shaikh’s ‘green Mumbra’ statement amid rising political tensions in Maharashtra.
Former Aurangabad mayor Rashid Mamu addresses media, reacting to Sahar Shaikh’s ‘green Mumbra’ statement amid rising political tensions in Maharashtra.Sarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News : 'सगळा मुंब्रा हिरवा करू' या एमआयएमच्या तरुण नगरसेविका सहर शेख यांच्या विधानावरून राज्यभरात मोठा गदरोळ सुरू आहे. पोलीसांनी सहर शेख हिला नोटीस बजावल्यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील तातडीने मुंब्रा येथे गेले आणि त्यांनी सहर शेख हिची पाठराखण केली. एवढेच नाही तर सगळा महाराष्ट्र हिरवा करू, असे विधान करत हा वादा मिटवण्याऐवजी अधिकच पेटवला.

हिरवा-भगवा यावरून राजकीय वातावरण तापलेले असताना छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर अब्दुल रशीद खान उर्फ 'मामू' यांनी या वादात उडी घेत सहर शेख हिची कानउघाडणी केली. सहर शेख ही बच्ची आहे, तिला अजून राजकारण कळत नाही. माझी तिची भेट झाली तर तिली नक्कीच समजावून सांगेल, असे म्हणत मामूंनी एमआयएमला टोला लगावला.

लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे की इस्लामचा रंग हिरवा नसून पांढरा आहे. मात्र देशामध्ये भगवा हिंदूंचा आणि हिरवा मुस्लिमांचा अशी विभागणी करत राजकारण्यांनी रंगांमध्ये समाज वाटू नये, असे आवाहन मामू यांनी केले. मुंब्राच काय सगळा महाराष्ट्र हिरवा करू म्हणणारे इम्तियाज जलील स्वतःच्या शहराला हिरवं करू असं का बोलत नाहीत?

Former Aurangabad mayor Rashid Mamu addresses media, reacting to Sahar Shaikh’s ‘green Mumbra’ statement amid rising political tensions in Maharashtra.
Jalna ZP News : जालना जिल्हा परिषदेत एक सदस्य वाढणार! संख्या आता 57 वर..

नितेश राणे बोलले म्हणून तुम्हीही तसंच बोललं पाहिजे का? मोठ्या नेत्यांनी विचार करून बोलायला पाहिजे. समोरचा दारू पिणारा असेल तर आपणही दारू प्यायची का? समोरचा चुकीचा वागत असेल तर आपणही तसेच वागायचं का? आपल्याला काय करायचं आहे, हे आपण ठरवलं पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला.

Former Aurangabad mayor Rashid Mamu addresses media, reacting to Sahar Shaikh’s ‘green Mumbra’ statement amid rising political tensions in Maharashtra.
Chhatrapati Sambhajinagar News : सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा 'कार'नामा, बापलेकांना उडवले; गुन्हा दाखल होईना...

शिक्षण, रोजगारावर बोला..

सहर शेख यांच्यासारख्या तरुण नेत्यांनी शिक्षण, रोजगार, आरक्षणासारख्या विषयावर बोललं पाहिजे. तुमच्या मतदारसंघात हिंदू, मुस्लिम, दलित असे सर्वच समाजाचे लोक राहतात. लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला सर्वांना सोबत घेऊन चालावे लागते. राजकारणातील ज्येष्ठ लोक जर चुकीचे बोलत असतील, तर तरुण त्यांना बघूनच बिघडत आहेत, मोठे सुधारले तरच लहान सुधारतील, असा चिमटा रशीद मामू यांनी या निमित्ताने काढला. भविष्यात कधी सहर शेख यांची भेट झाली, तर मी त्यांना नक्कीच समजून सांगेन की विचार करून बोलले पाहिजे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com