Imitaz Jaleel On Raj Thackerays Speech News Sarkarnama
मराठवाडा

Imtiaz Jaleel On Raj Thackeray News : औरंगजेबची कबर काढू नये, राज ठाकरेंच्या भूमिकेशी इम्तियाज जलील सहमत!

Raj Thackeray has expressed his views on the removal of Aurangzeb's grave, urging that the new generation should learn history. His stance has been acknowledged by Imtiaz Jaleel. : राज ठाकरे यांची भूमिका योग्य आहे, औरंगजेबची कबर काढून न टाकता त्यावेळचा जो काही इतिहास आहे, तो लोकांना कळू द्यावा.

Jagdish Pansare

AIMIM News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यातील भाषणात औरंगजेब कबरीवरून सुरु असलेल्या राजकारणावर भाष्य केले. ही कबर काढून न फेकता ती तशीच कायम ठेवून तिथे एक फलक लावावा, महाराष्ट्रावर चाल करून आलेल्या औरंगजेबला इथेच गाडला हा इतिहास नव्या पिढीला कळू द्या, अशी भूमिका मांडली. यावर एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भूमिका योग्य आहे, औरंगजेबची कबर काढून न टाकता त्यावेळचा जो काही इतिहास आहे, तो लोकांना कळू द्यावा. ही कबर लोकांनी जाऊन बघावी, इतिहास कसाही असला तरी या देशावर औरंगजेबने राज्य केले आहे. तो एक मोठा कार्यकाळ कार्यकाळ होता. औरंगजेब जेव्हा मारणार होता तेव्हा राजा असूनही त्याने आपली कबर साधी असावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानूसारच ती आहे.

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात जो मुद्दा सांगितला आहे, ती कबर काढू नये, तिथेच ठेवावी आणि इतिहास काय होता ते लोकांना कळू द्या, ते योग्य आहे. ज्यांना पाहायची आहे ते लोक पाहातील आणि जे लोक धर्माच्या नावाखाली कबर उखडून टाकण्याची भाषा बोलतात, ते सर्व छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन घाणेरडे राजकारण करत आहेत, अशी टीकाही इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी केली.

शिवाजी महाराजांनी अफजलखान याला ठार केले होते. पण त्यांची कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधली. जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे संभाषण सांगते की, एकदा माणूस मेला की वैर संपते. तीनशे वर्षापूर्वी काय झाले होते ते इम्तियाज जलील यांनी सांगितले पाहिजे का? असा सवाल करत तुमच्याकडे कुठले मुद्दे राहिलेले नाही म्हणून हे मुद्दे घेऊन तुम्हाला राजकारण करायचे आहे का? असेही इम्तियाज जलील म्हणाले.

पण लोक आता खूप हुशार झाले आहेत, एक ते दोन टक्के लोक हे प्रत्येक समाजात असे असतात. जसे हिंदूंमध्ये आहेत, तसे ते आमच्यातही आहेत, असेही इम्तियाज जलील म्हणाले. वक्फ बोर्डा संदर्भात सरकारने पार्लामेंटरी कमिटीचा अहवाल विचारात न घेता बहुमताच्या जोरावर एकतर्फी निर्णय घेतल्या आरोप इम्तियाज जलील यांनी केला. वक्फ बोर्डाची संपत्ती मुस्लिम समाजाची आहे. ही काही तुमची जहागीर नाही, अशा शब्दात इम्तियाज यांनी संताप व्यक्त केला.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT