Imtiaz Jaleel On Kunal Kamra : तेव्हा समर्थन केले, आता स्वतःची थोडी थट्टा झाली तर हिंसाचार करू लागले! इम्तियाज जलील यांनी टायमिंग साधले

Imtiaz Jaleel criticized Shinde's Shiv Sena in a timely manner. Read more about his comments and political stance on the recent developments. : सराला बेट येथील गंगागिरी महाराज मठाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत कीर्तनामधून आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.
Imtiaz Jaleel News
Imtiaz Jaleel NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics News : स्टॅन्डअप कॉमेडियन कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणे सादर केल्यानंतर राज्यातील वातावरण आणि विधिमंडळातील चर्चा चांगलीच तापली आहे. कारवाईच्या मागणीसाठी सत्ताधारी पक्षाने सभागृह डोक्यावर घेतले आहे तर विरोधकांनी कुणाल कामराचा बचाव करत त्याच्या गाण्याचे समर्थन केले. या वादात आता एमआयएमने उडी घेतली आहे.

माजी खासदार तथा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसैनिकांना उद्देश 'एक्स'वर प्रतिक्रिया दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री असताना छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील एका साधूने पैगंबर मोहम्मद यांचा अवमान केला होता. तेव्हा शिंदे यांनी या साधूची बाजू घेत त्यांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, असे म्हटले होते.

इम्तियाज जलील यांनी आपल्या प्रतिक्रियेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व त्यांच्या पक्षाला याची आठवण करून देत टोला लगावला आहे. 'गेल्या वर्षी जेव्हा एका बोगस साधूने पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली होती तेव्हा तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या साधूचे समर्थन केले होते आणि असेही म्हटले होते की कोणीही त्याच्या केसालाही हात लावू शकणार नाही. आता स्वतःची थोडीशी थट्टा केल्यानंतर त्याच्या पक्षाची गुंड हिंसाचार करून वेडे झाले आहेत. मी कुणाल कामराचे पूर्णपणे समर्थन करतो' असे म्हणत इम्तियाज जलील यांनी टायमिंग साधत एकनाथ शिंदे आणि शिवसेनेवर निशाणा साधला.

Imtiaz Jaleel News
Imtiaz Jaleel News : इतिहास मिटवायचा नसतो, तर त्यातून बोध घ्यायचा असतो! इम्तियाज जलील यांनी मांडली भूमिका

सराला बेट येथील गंगागिरी महाराज मठाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत कीर्तनामधून आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या प्रकरणी राज्यभरात विविध ठिकाणी त्यांच्याविरोधात गुन्हे नोंद झाले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. याच घटनेचा हवाला देत इम्तियाज जलील यांनी शिवसेनेला डिवचले.

Imtiaz Jaleel News
Eknath Shinde Controversy : 'ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी...', एकनाथ शिंदेंवर वादग्रस्त गाणं, शिवसैनिक आक्रमक; स्टुडिओ फोडलं, कुणाल कामरावर गुन्हा

दरम्यान, रविवारी रात्री शिवसैनिकांकडून मुंबईतील हॉटेलमध्ये जाऊन कामराच्या शोच्या सेटची तोडफोड करण्यात आली. द हॅबिटॅट स्टुडिओची 60 ते 70 जणांकडून तोडफोड करण्यात आल्यानंतर या प्रकरणी खार पोलिसांनी 11 शिवसैनिकांना अटक केली होती. त्यांना आज जामीन देखील मंजूर झाला आहे.

Imtiaz Jaleel News
Kunal Kamra : शिंदेंच्या आधी, PM मोदींवरही कविता; वादग्रस्त कुणाल कामरा कोण आहे?

कुणाल कामरावर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. सुपारी घेऊन जर कुणी अपमानित करत असेल, तर त्यांच्यावर कारवाई केलीच जाईल. अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे म्हणत छात्या बडवणाऱ्यांना मी स्पष्टपणे सांगतो, या गोष्टी महाराष्ट्रात आम्ही सहन करणार नाही, असेही फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com