Babanrao Dhakane Passed Away Sarkarnama
मराठवाडा

Babanrao Dhakne Death : बबनराव ढाकणेंचा बीड जिल्ह्याशी 'असा'ही होता कनेक्ट; 1989 ला...

Datta Deshmukh

Beed News : माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव दादाबा ढाकणे यांचे गुरुवारी रात्री ८७ वर्षी निधन झाले. त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून नगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, गुरुवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.

खासदार,केंद्रीय मंत्री,राज्यात कॅबिनेट मंत्री, विधानसभेचे विरोधी पक्षनेते, विधानसभा उपाध्यक्ष अशी अनेक महत्त्वाची पदे भूषविलेल्या बबनराव ढाकणे(Babanrao Dhakne) यांचा बीड जिल्ह्याशी तेवढाच जवळचा संबंध आहे.

विशेष म्हणजे त्यांच्यामुळे जिल्ह्याला पहिल्यांदा केंद्रात मंत्रिपद मिळाले होते. जिल्ह्यातील मातब्बर नेत्या केशरबाई क्षीरसागर यांचा बबनराव ढाकणे यांनी १९८९ मध्ये धक्कादायक पराभव केला होता. त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्रिपदही सांभाळले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ऊसतोड कामगार नेते असलेले बबनराव ढाकणे यांनी १९८९ साली जनता दलाकडून बीड लोकसभेची निवडणुक लढविली होती.त्यावेळी त्यांचा सामना जिल्ह्यातील काँग्रेसच्या तत्कालीन मातब्बर नेत्या केशरबाई क्षीरसागर(Kesharbai Kshirsagar) यांच्याशी झाला. बबनराव ढाकणे यांनी या निवडणुकीत केशरबाई क्षीरसागर यांचा पराभव केला. बबनराव ढाकणे बीड लोकसभेचे नववे खासदार म्हणून विजयी झाले होते. तत्पूर्वी सलग दोनवेळा केशरबाई क्षीरसागर जिल्ह्याच्या खासदार होत्या.

यानंतर त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळाले होते. स्वातंत्र्यानंतर बबनराव ढाकणे यांच्यामुळे जिल्ह्याला तब्बल ५८ वर्षांनी केंद्रीय मंत्रिपदाचा मान मिळाला होता. त्यानंतरही पुन्हा केंद्रात मंत्रिपद मिळायला २४ वर्षे लोटावी लागली. जिल्ह्याचे तत्कालीन खासदार जयसिंगराव गायकवाड केंद्रात मंत्री झाले होते. दरम्यान, लोकसभेची मुदतपूर्व निवडणूक झाली.

त्यानंतर बबनराव ढाकणे यांना विधान परिषदेवरदेखील संधी मिळाली आणि पशुसंवर्धन व दुग्धविकास ही खाती मिळाली. यावेळीही त्यांनी १९९४ मध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केले. 1986 मध्ये चिंचवण (ता. वडवणी) येथे ऊसतोड कामगार व सरकारमध्ये करार झाला.(Latest Marathi News)

तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, जिल्ह्याचे तत्कालीनन पालकमंत्री अशोक पाटील, कामगार मंत्री भगवंतराव गायकवाड समाजकल्याण मंत्री दादासाहेब रूपवते, शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांच्यासह त्यावेळी ऊसतोडणी मजूर संघटनेचे अध्यक्ष असलेल्या बबनराव ढाकणे यांनी यांची उपस्थिती होती.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT