Sushma Andhare-Lalit Patil case : ...तर ललित पाटीलचा एन्काउंटर होऊ शकतो; सुषमा अंधारेंचा आरोप

Lalit Patil Durgs case Update : याआधीही अशा घटना घडल्या आहेत.
Lalit Patil Durgs case Update :
Lalit Patil Durgs case Update : Sarkarnama
Published on
Updated on

Pune Crime News : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात दिवसेंदिवस मोठमोठे खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात काही राजकीय नेतेमंडळींचाही सहभाग असल्याचा संशय विरोधकांकडून व्यक्त केला जात आहे, पण या राजकीय मंडळींची नावे समोर येऊ नयेत म्हणून ललित पाटीलचा एन्काउंटर होऊ शकतो, असा दावा काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याला ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीदेखील दुजोरा दिला आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या, ' याआधीही अशा घटना घडल्या आहेत. आर्यन खान प्रकरण झाले होते. त्यावेळी त्या ठिकाणी काही पंचनामा करणारे लोक होते. त्यातला एक जण दिवंगत मनोज संसारे यांच्या माध्यमातून तो समोर आला होता, पण अचानक काहीतरी घडले आणि त्याचा मृत्यू झाला. तसाच दुसऱ्याही एकाचा असाच मृत्यू झाला. त्यामुळे बरचशी माहिती बाहेर येता येता राहिली. ललित पाटील या प्रकरणात एकटा तर निश्चित नाही. एवढी यंत्रणा काम करत असेल, तर हे नक्कीच मोठे नेक्सस आहे. त्यामुळे ललित पाटीलच्या जीविताची काळजी घेणे हेदेखील गरजेचे आहे. कारण ललित पाटीलला संपवून हा तपासच संपण्याचा प्रयत्न होऊ शकतो. ललित पाटीलचाही एन्काउंटर किंवा संशयास्पद मृत्यू होऊ शकतो. कशावरच विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नाही. या सगळ्या प्रकरणात ललितच्या जिवाचे रक्षण हेही आव्हान आहे.

Lalit Patil Durgs case Update :
Guardian Minister : गावित निघाले हुशार अन् अनुभवी; एकाच झटक्यात सगळं समजले...

ससूनचे 'डीन' संजीव ठाकूर हे ललितवर कोणते उपचार सुरू होते. याबाबत काहीही बोलायला तयार नव्हते, पण ललितवर खुद्द 'डीन' ठाकूर हेच उपचार करत असल्याचे समोर आले आहे. यावरही सुषमा अंधारे यांनी भाष्य केले आहे. गेल्या दीड महिन्यापासून आम्ही ललित पाटील प्रकरणाचा पाठपुरावा करत आहोत. यामागे राज्यातील तरुणाईला आणि त्यांचे आरोग्य वाचवणे हा प्रधान हेतू आहे. ससून रुग्णालयाच्या गेटवर दोन कोटींचे ड्रग्ज सापडणे ही अत्यंत चिंताजनक, धक्कादायक गोष्ट आहे आणि म्हणून ससूनमधल्या काही लोकांची चौकशी होणे गरजेचे असल्याचे सुषमा अंधारे यांनी सांगितले.

तसेच या चौकशीत सर्वात आधी 'डीन'ची चौकशी व्हायला पाहिजे. जर एखाद्या कैद्यावर उपचार करायचे असतील तर सर्वात आधी कारागृह निरीक्षक आणि त्यांच्या अंडर असलेले अधिकारी या लोकांकडून त्या कैद्याची माहिती येत असते. त्या कैद्याची माहिती ज्या -ज्या लोकांकडे गेली, त्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे. त्यामुळे ससूनच्या 'डीन'ची चौकशी व्हावी, अशी मागणी आम्ही पहिल्यापासूनच करत आहोत. आता तर त्या मागणीवर शिक्कामोर्तब झाले आहे. ललित पाटील ज्याच्या मोटारीतून पळाला तो विनय अऱ्हाना, यांच्यावर ससूनचे 'डीन' संजीव ठाकूर हेच उपचार करत होते. हेही आता समोर आले आहे. या सर्व बाबी समोर आल्या असतील, तर राज्याचे गृहमंत्री कशाची वाट बघत आहेत, असा सवाल सुषमा अंधारे यांनी विचारला आहे.

ससूनच्या 'डीन'वर कारवाई न होण्यामागेही फार मोठा राजकीय वरदहस्त आहे, असे मला वाटते. यातूनच ते बेताल, बेफिकिरीने वागत आहेत. लोक देवाकडे देवदूताच्या नजरेतून बघत असतात, पण संजीव ठाकूर यांची कृती डॉक्टरी पेशालाच काळे फासणारी आहे. त्यांनी एका गुन्हेगाराला आश्रय देण्यासाठी आणि त्याचा रुग्णालयातील अधिवास वाढण्यासाठी ज्या पद्धतीने प्रयत्न केले तो हे नुसते संशयास्पद नाही, तर हा एक गंभीर अपराध आहे. त्यांना तातडीने पदावरून दूर करून सहआरोपी केले पाहिजे, अशीही मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Lalit Patil Durgs case Update :
Devendra Fadnavis News : आमदार गायकवाडांच्या नातीची भेट निमित्त; फडणवीसांची 'कल्याण'मध्ये आजी-माजी आमदारांसोबत खलबतं

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com