Rajesh Tope, Babanrao Lonikar
Rajesh Tope, Babanrao Lonikar sarkarnama
मराठवाडा

बबनराव लोणीकरांचे, टोपेंबद्दल अपशब्द; म्हणाले टोपे का...

सरकारनामा ब्यूरो

जालना : माजी मंत्री आणि परतूरचे भाजप आमदार बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांची जिभ घसरली. लोणीकर यांनी जालन्याचे जिल्हाधिकारी विजय राठोड यांच्या दालनात ठिय्या मांडत आंदोलन केले. अतिवृष्टीची नुकसान भरपाई आणि पिकविम्याची मदत मिळावी यासाठी हे आंदोलन करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलत असताना त्यांनी राज्याचे आरोग्य मंत्री आणि जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्याबद्दल अपशब्द वापरले.

या वेळी महावितरण कंपनीकडून होणारी वीजबिल वसुली थांबवण्याची मागणीही लोणीकर यांनी केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल लोणीकरांनी जिल्हाधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र, या वेळी बोलत असताना लोणीकर यांचा तोल गेला. लोणीकर म्हणाले, टोपे हा राज्यपालांच्या पोटचा आहे का? हरामखोर असे शब्द त्यांनी वापरले. यापूर्वी ही लोणीकर यांची महिला अधिकाऱ्यांबद्दलची वक्तव्ये चांगलीच चर्चेत आली होती. त्यांनी एका महिला अधिकाऱ्याला हिरोईन, तर एका महिला तहसिलदारास हेमामालिनी असे म्हटले होते. त्यानंतर आता राजेश टोपे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

या वेळी बोलताना लोणीकर म्हणाले, आष्टी मधला प्रकल्प आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रकल्प या प्रकल्पासाठी आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांनी एक रुपयाही दिली नाही. राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा प्रकल्प आहे तरी आम्हाला पैसे मिळाले नाही. जिल्ह्यात २५० कोटी रुपये आले पण कुठे दिले कोणाला दिले हे माहिती नाही. आम्ही भाजपचे तीन आमदार आहोत आम्हाला कोणीही विचारले नाही, असा आरोप लोणीकर यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT