Babanrao Lonikar Speech In Bhokardan News Sarkarnama
मराठवाडा

Raosaheb Danve-Babanrao Lonikar : रावसाहेब दानवेंसोबत वाद होते, पण आता ते मिटलेत; आमची दोस्ती आता शोलेमधल्या जय-वीरू सारखी!

Babanrao Lonikar Speech In Bhokardan : रावसाहेब तेव्हा जर तुम्ही मला एखादा फोन केला असता आणि मी इथे जालन्यात फिरलो असतो तर आज चित्र वेगळे दिसले असते?

Jagdish Pansare

  1. माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी भोकरदनमध्ये भाषण करताना दानवे आणि त्यांची मैत्री आता शोलेमधील जय-वीरू सारखी असल्याचे वक्तव्य केले.

  2. पूर्वीचे मतभेद संपल्याचा संकेत देत महायुतीत एकीचा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

  3. या वक्तव्यामुळे जालन्यातील राजकीय वातावरणात नवीन चर्चा रंगल्या आहेत.

Jalna Politics News : जालना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरून माझ्यात आणि रावसाहेब दानवे यांच्यात वाद होते. पण आता ते संपले आहेत, कोणाच्या सांगण्यावरून किंवा वरून आदेश आला म्हणून नाही, तर आम्ही दोघांनी ठरवत कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. आता आमची दोस्ती शोले चित्रपटातील अमिताभ-धर्मेंद्र यांच्यासारखी झाली आहे, असे सांगत माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी भोकरदनमध्ये 'ये दोस्ती हम नही तोडेगें'चा सूर आळवला.

दोन दिवसापुर्वी रावसाहेब दानवे हे परतूमध्ये गेले होते. यावेळी त्यांनीही आपले आणि बबनराव लोणीकर यांच्यातील वाद मिटले असल्याचे स्पष्ट करत त्यांना भोकरदनमध्ये येण्याचे आमंत्रण दिले होते. त्यानूसार आज लोणीकर भोकरदनला आले आणि आमच्यातील जुने वाद आता मिटल्याचे सांगीतले. मी, रावसाहेब दानवे, कैलास गोरंट्याल, संतोष दानवे एकत्र आल्यानंतर विरोधकांचे काय होईल? जालना महापालिका आणि जिल्हा परिषदेत आता आपलाच महापौर आणि अध्यक्ष होईल, असा दावा लोणीकरांनी केला.

जालना लोकसभा निवडणुकीच्यावेळी माझ्यावर बीडची जबाबदारी देण्यात आली होती. पण मी तिथे जाऊन काय केले? रावसाहेब तेव्हा जर तुम्ही मला एखादा फोन केला असता आणि मी इथे जालन्यात फिरलो असतो तर आज चित्र वेगळे दिसले असते? असे म्हणत दानवे यांच्या पराभवावरही भाष्य केले. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा माझ्या मतदारसंघाचा असावा, अशी माझी इच्छा होती, तर रावसाहेब दानवेंना त्यांच्या मतदारसंघातला अध्यक्ष करायचा होता. दोघांचीही भूमिका चूकीची नव्हती, पण त्यावरूनच आमच्यात वाद झाले होते, अशी कबुली लोणीकर यांनी यावेळी दिली.

मला नांदेडहून बोलावून घेतले..

लोणीकर यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीचा किस्सा उपस्थितांना सांगितला. नांदेड लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी माझ्यावर तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या रावसाहेब दानवेंनी दिली होती. उमेदवार निवडून आला नाही तर मंत्रीपद मिळणार नाही, असा इशाराच मला त्यांनी दिला होता. पण माझा पायगुण असा, की प्रताप पाटील चिखलीकर खासदार झाले.

दरम्यान, रावसाहेब दानवे आजारी पडले, ते सिग्मामध्ये भरती झाले. इकडे बाहेर त्यांना हा आजार, झाला तो आजार झाला, अशा चर्चा सुरू होत्या. एकदिवशी मला रावसाहेबांचा फोन आला, लोणीकर तुम्ही नांदेडमध्ये काय करता? इकडे या आणि संतोष दानवेसोबत प्रचार करा. मी म्हटलं तुम्हीच मला नांदेडला पाठवलं, तेव्हा मुख्यमंत्र्यांना एक फोन करा, त्यांनी सांगितलं तर मी येतो. त्यानंतर मी नांदेडहून जालन्यात प्रचाराला आलो आणि रावसाहेब दानवे निवडून आले. आता त्यांनी मला लोकसभेसाठी परभणीतून उमेदवारीसाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. मी देखील परतूर मतदारसंघ राहूलसाठी सोडण्याचा निर्णय घेतल्याचे लोणीकरांनी जाहीर केले.

आमचे भांडण मतदारसंघ आणि कार्यकर्त्यासाठी..

बबनराव लोणीकर यांच्यानंतर रावसाहेब दानवे यांनीही आपल्यातील वाद किंवा भांडण हे वैयक्तिक नव्हते तर मतदारसंघ आणि कार्यकर्त्यासाठी होते, असे सांगत आता आम्ही एकत्र असल्याचा पुनरुच्चार केला. सुरुवातीच्या काळात जालना जिल्ह्यात भाजपचा एकमेव मी आमदार होतो, आज तीन आमदार आहेत. पक्षाची ताकद वाढली आहे, त्यामुळे जालन्याचा महापौर आणि जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा आपलाच होईल यात शंका नाही, असा दावा दानवे यांनी केला.

FAQs

1. लोणीकरांनी दानवे यांच्याबद्दल काय वक्तव्य केले?
त्यांनी दोघांची मैत्री आता शोलेमधील जय-वीरू सारखी घट्ट असल्याचे सांगितले.

2. हे वक्तव्य कुठे करण्यात आले?
भोकरदनमधील एका सार्वजनिक सभेत.

3. या वक्तव्याचा राजकीय अर्थ काय लावला जातो?
महायुतीत पुन्हा एकजूट दाखवण्याचा आणि स्थानिक पातळीवरील मतभेद मिटल्याचा संकेत मानला जातो.

4. लोणीकर-दानवे यांच्यात पूर्वी मतभेद होते का?
होय, दोघांमध्ये काही राजकीय मतभेद प्रचलित होते.

5. या विधानामुळे स्थानिक राजकारणात काय प्रतिक्रिया दिसत आहेत?
कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता वाढली असून हे वक्तव्य राजकीय चर्चेचा विषय ठरत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT