Sharad Pawar, Bachchu Kadu Sarkarnama
मराठवाडा

Bachchu Kadu On Sharad Pawar : शरद पवारांचा मणिपूरबद्दल 'तो' दावा बच्चू कडूंनी खोडला; म्हणाले...

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : राज्यात गेल्या काही दिवसांपासून दोन समाजात वादाचे वातावरण झाल्याचे दिसत आहे. त्यातच विशाळगडाचे प्रकरणही घडल्याचे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

या वाढणाऱ्या प्रकारांमुळे राज्यात मणिपूरसारखी स्थिती होण्याची भीती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली होती. मात्र तसे काही होणार नाही, असे म्हणत माजी मंत्री बच्चू कडू यांनी शरद पवारांचा दावा खोडून काढला.

धाराशिवच्या उमरगा शहरात सोमवारी बच्चू कडू Bachchu Kadu एका खासगी कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी शरद पवारांनी व्यक्त केलेल्या भीतीवर टिपण्णी केली. अलीकडच्या काळात महाराष्ट्रातही मणिपूरसारखी स्थिती होते की काय, अशी चिंता वाटू लागल्याचे वक्तव्य शरद पवारांनी केले होते. शरद पवारांचा हा दावा खोडून काढत असे कुठलंही चित्र नसल्याचे बच्चू कडूंनी म्हटले.

राज्याची मणिपूरसारखी अवस्था होऊ नये अशी प्रार्थनाही बच्चू कडू यांनी केली. ते म्हणाले, महाराष्ट्रात मणिपूरसारखी स्थिती होईल असे काहीही चित्र नाही. हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राने सोसल्या आहेत. याचा अनुभव महाराष्ट्रातल्या लोकांना आहे, असे स्पष्ट मत कडू यांनी व्यक्त केले.

राज्यात दोन समाज एकमेकांसमोर उभे आहेत. या स्थितीबाबत कडू यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर टीकेची झोड उठवली. बच्चू कडू म्हणाले, मी जर कोणत्याही धर्माची भाषा बोललो असतो तर आज माझ्या पक्षाचे 25 आमदार असते. मात्र आम्ही हक्काची लढाई लढत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, वाशी येथे बोलताना शरद पवारांनी Sharad Pawar मणिपूर, त्या शेजारील राज्ये, कर्नाटकमध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्यात आला. तीच स्थिती महाराष्ट्रातही होऊ पाहत आहे. मात्र आपल्या राज्याला शिवाजी महाराज, शाहू महाराजा यांचा इतिहास आहे. त्यांनी राज्यात ऐक्य निर्माण केले आहेत. त्यामुळे आपल्या राज्यात मणिपूरसारख्या घटनांना थारा नाही, असा विश्वासही व्यक्त केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT