Bachchu Kadu : ...तर आज माझे 25 आमदार असते; बच्चू कडूंचा सत्ताधारी, विरोधकांवर प्रहार!

Prahar Party : दिव्यांग मंत्रालय घेऊन येणारा देशातील पहिला आमदार तुमचा बच्चू कडू आहे.
Bachchu Kadu
Bachchu KaduSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv Political News : राज्यात वर्षभरांपासून धार्मिक तेढांच्या घटना घडल्या आहेत. तसेच गेल्या काही महिन्यांपासून जाती-जातींत वादाची स्थिती झाल्याचे चित्र आहे. तर कोल्हापूरातील विशाळगडावरील घटनाही ताजीच आहे. त्यामुळे राज्यात राजकारणासाठी समाजिक तेढ निर्माण होत आहेत.

राज्यातील प्रत्येक पक्ष कोणत्या ना कोणत्या जातीची, धर्माची भाषा करत असल्याचा आरोप होऊ लागला आहे. मी कोणत्या धर्माची भाषा बोललो असतो तर माझे 25 आमदार असते, असा विश्वास व्यक्त करत माजी मंत्री बच्चू कडू यांनी राज्यातील स्थितीवरून सत्ताधाऱ्यांवर प्रहार केला.

धाराशिवच्या उमरगा शहरात सोमवारी बच्चू कडू Bachchu Kadu एका खासगी कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर टीकेची झोड उठवली. बच्चू कडू म्हणाले, मी जर कोणत्याही धर्माची भाषा बोललो असतो तर आज माझ्या पक्षाचे 25 आमदार असते. मात्र आम्ही हक्काची लढाई लढत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दोन वर्षांपूर्वी झालेल्या शिवसेनेच्या बंडात बच्चू कडू राज्यमंत्री पद सोडून सहभागी झाले होते. तो निर्णय दिव्यांगांसाठी घेतल्याचे कडू यांनी सांगितले. आम्ही सत्तांतरात सहभागी झालो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्यासोबत गेलो. मात्र दिव्यांग मंत्रालय घेऊन आलो आहोत. दिव्यांगांसाठी मंत्रालय आणणारा बच्चू कडू हा देशातील पहिला आमदार आहे, असा दावाही कडू यांनी यावेळी केला.

Bachchu Kadu
Ajit Pawar : अजित पवारांना 'सुप्रीम' नोटीस; राष्ट्रवादी आमदार अपात्रतेवर कोर्टात नेमकं काय झालं?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com