Bachchu Kadu Sarkarnama
मराठवाडा

Bachchu Kadu : 'कमी दरात सोयाबीन विकावं लागत असेल तर बांगड्या भरा; स्वत:ला संपवण्यापेक्षा आमदाराला कापून टाका...', बच्चू कडूंची संतप्त प्रतिक्रिया

Bachchu Kadu on Farmer Rights : 'तुम्ही विचाराची लढाई सोडली आणि जातीपातीची लढाई सुरू केल्यामुळे मागे राहिला. तुम्हाला कमी भावात सोयाबीन विकावं लागत असेल तर शेतकऱ्यांनी बांगड्या भराव्यात', अशा शब्दात माजी आमदार तथा प्रहार पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना आपल्या हक्कासाठी जातीपातीत न अडकता लढा, असं आवाहन केलं.

Jagdish Patil

Buldhana News, 20 Oct : 'तुम्ही विचाराची लढाई सोडली आणि जातीपातीची लढाई सुरू केल्यामुळे मागे राहिला. तुम्हाला कमी भावात सोयाबीन विकावं लागत असेल तर शेतकऱ्यांनी बांगड्या भराव्यात', अशा शब्दात माजी आमदार तथा प्रहार पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना आपल्या हक्कासाठी जातीपातीत न अडकता लढा, असं आवाहन केलं.

मागील काही दिवसांपासून बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. अशातच त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावात राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषद बोलताना आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे.

या परिषदेसाठी बच्चू यांच्यासह राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे दीपक केदारही उपस्थित होते. बच्चू कडू म्हणाले, 'ही दुःखाची परिषद आहे. दिवाळी दिवशी ही घ्यावी लागत आहे. तुम्ही विचाराची लढाई सोडली आणि जातीपातीची लढाई सुरू केल्यामुळे शेतकरी मागे राहिला. कमी भावात सोयाबीन विकावं लागत असेल तर शेतकऱ्यांनी बांगड्या भरल्या पाहिजेत.

मोर्चे, मेळावे, प्रचाराला गर्दी असते, मात्र शेतकरी परिषदेला गर्दी कमी. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तलवारीने सुरू झालेली लढाई लेखणीने संपवली. शरद जोशी अडीच लाखांची नोकरी सोडून शेतकऱ्यांसाठी लढले. पण या सरकारने शेतकऱ्यांना भगवा, हिरव्या, निळ्या रंगात वाटलं आणि त्यामुळे शेतकरी विभागला गेलाय, असं बच्चू कडू म्हणाले.

तर शरद जोशींना, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आणि मलाही शेतकऱ्यांनीच पाडलं कारण मी जातीत बसलो नाही. तुम्ही असंच कराल तर तुमच्यासाठी कोणीही लढणार नाही, असंही कडू म्हणाले. तर लोकसभेच्या निवडणुकीत असताना तुम्ही कपाशी आणि सोयाबीनला भाव मागितला का? असा सवाल करत त्यावेळी तुम्ही जात पाहिली.

पण सर्व जाती याच मातीमुळे जगतात हे विसरू नका. शेतकरी हे सगळ्या जातीत सापडतात. सर्वात जास्त मेहनत आमची आणि आपल्याला हे लुटतात, असा हल्लाबोल त्यांनी सरकारवर केला. सरकार हे डुकरासारखा आहे, डुक्कर परवडलं पण सरकार नाही, अशा तीव्र शब्दात त्यांनी सरकारवर टीका केली.

शिवाय शहरातले आमदार परवडले, पण शेतकऱ्यांचा आमदार परवडत नाही. अरे तुमच्यापेक्षा तुमचा बैल बरा त्याला लाथ तरी मारता येते. शेतकऱ्याला आपण जर विचारलं तर तू काय करतो तर त्याला काहीच येत नाही. अरे आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका. हा कार्यक्रम जर सुरू केला तर गुडघ्यावर येईल सरकार, असं संतप्त वक्तव्य बच्चू कडूंनी या परिषदेत केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT