Ranjeet Kasle Arrest : वादग्रस्त बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासलेला गुजरात पोलिसांनी केली अटक, पण का?

Gujarat Police Arrest Ranjeet Kasle : बडतर्फ वादग्रस्त पोलीस अधिकारी रणजीत कासले याला गुजरात पोलिसांनी लातूरमधून अटक केली आहे. गुजरात राज्यातील सुरत शहराच्या परिसरातील घरफोडी प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींनी रणजीत कासलेबाबतची माहिती पोलिसांना दिली.
ranjeet Kasle
ranjeet Kaslesarkarnama
Published on
Updated on

Ranjeet Kasle Arrest : बडतर्फ वादग्रस्त पोलीस अधिकारी रणजीत कासले याला गुजरात पोलिसांनी लातूरमधून अटक केली आहे. गुजरात राज्यातील सुरत शहराच्या परिसरातील घरफोडी प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींनी रणजीत कासलेबाबतची माहिती पोलिसांना दिली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी शोध मोहीम राबवून कासलेला अटक केली. तर पोलिसांनी पकडताच केली कासलेने 'पुष्पा' स्टाईल अ‍ॅक्शन केल्याचे फोटो समोर आले आहेत.

काल मध्यरात्री लातूरमधून त्याला अटक करण्यात आली. घरफोडी करणाऱ्या आरोपींना मदत केल्याचा संशय गुजरात पोलिसांना कासलेवर आहे. लातूर आणि गुजरात पोलिसांनी एकत्रित केलेल्या शोध मोहीमीनंतर रणजीत कासलेला एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेण्यात आलं.

ranjeet Kasle
Chandrakant Khaire News : माझे वर्चस्व नाही म्हणणारे, भागवत कराडच 'मला शिवसेनेत घ्या म्हणून आले होते' चंद्रकांत खैरेंचा दावा!

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि वाल्मीक कराडशी संबंधित काही व्हिडिओ रणजीत कासलेने सोशल मीडियावर व्हायरल केले होते. शिवाय त्याने अनेकदा फेसबुक लाईव्ह करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर काही मंत्र्यांवर खळबळजनक आरोप केले होते.

ranjeet Kasle
Prakash Abitkar : दिवाळीच्या मुहूर्तावर आरोग्यमंत्र्यांनी दिली गुड न्यूज, एका महिन्यात मिळणार उपचाराचे पैसे

या प्रकरणी त्याला पोलिसांनी अटकही केली होती. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकरणी आत्तापर्यंत कासलेवर 7 गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. रणजीत कासले हा बीडच्या सायबर विभागात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होता. त्यानंतर त्याला बडतर्फ करण्यात आलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com