TB Free Mission News
TB Free Mission News Sarkarnama
मराठवाडा

TB Free Mission News : मोदींच्या टी.बी.मुक्त अभियानाकडे भाजपसह, शिंदे, गटाच्या मंत्री, खासदार, आमदारांची पाठ..

प्रकाश बनकर

Marathwada : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्षयरोग (टी.बी) मुक्त भारत उपक्रमाची घोषणा केली. त्यानुसार सर्वच लोकप्रतिनिधी, नेते यांनी यासाठी पुढाकार घेत काही मुले दत्तक घेण्याचे आवाहन केले होते. (TB Free Mission News) विशेष करुन भाजपच्या मंत्री, लोकप्रतिनिधी यात पुढाकार घेण्याचे विशेष आवाहन केले होते. मात्र जिल्ह्यातील केवळ सहकारमंत्री अतुल सावे सोडता इतर मंत्री, आमदार, खासदार, शिंदे गटासह ठाकरे गटानेही या उपक्रमाकडे पाठ फिरवली आहे.

यामुळे जिल्ह्यातील हा उपक्रम केवळ कागदावर राहणार असल्याची स्थिती आहे. विशेष करुन भाजपच्या पदाधिकाऱ्याची उदासिनता यातून दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी ९ सप्टेंबर २०२२ रोजी टी.बी.मुक्त भारत अभियानाची सुरुवात केले. त्याच अनुषंगाने राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रमाची घोषणा केली. (Bjp) यात प्रत्येकाने पुढाकार घेत निक्षय मित्र बनून क्षयरुग्णांना दत्तक घेऊन त्यांना पोषण आहार द्यावा, असे आवाहन केले.

यात प्रमुख्याने भाजपच्या लोकप्रतिनिधींनी अधिकाधिक पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले होते. एका लोकप्रतिनीधीने किमान शंभर क्षयरोग रुग्णांना दत्तक घेण्याचे आवाहन महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आले होते. (Marathwada) त्यानुसार सहकारमंत्री अतुल सावे यांनी १०० रुग्ण दत्तक घेतले, पोषण आहारासाठी ३ लाख ६० हजार रुपये देखील दिले. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी देखील २०० रुग्ण दत्तक घेणार असल्याचे सांगितले. मात्र प्रत्यक्षात एकही रुग्ण अद्याप त्यांनी दत्तक घेतलेला नाही.

खासदार इम्तियाज जलील यांनी सर्व मुले दत्तक घेऊ शकतो असे सांगितले. मात्र प्रत्यक्षात एकही रुग्ण घेतला नाही. आमदार सजंय शिरसाट, प्रदीप जैस्वाल यांनीही या मोहिमेबाबत उदासीनता दाखवली. भाजपचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, विकास जैन यांच्यासह इतरांनी देखील एकही रुग्ण दत्तक घेतला नाही. शहरात १६०० क्षयरोगाचे रुग्ण आहेत. गेल्या तीन चार दिवसापुर्वी झालेल्या `मन की बात` मध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा विषय प्रामुख्याने मांडला होता.

राजकीय कार्यक्रमासाठी कोट्यवधी रुपये खर्च करणारे लोकप्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनालाही प्रतिसाद देत नसल्याचे यावरून दिसून आले आहे. एका क्षयरोग्याला सहा महिन्यासाठी अन्नधान्य व इतर पदार्थ पुरविण्यासाठी ५०० ते ६०० रुपये खर्च येऊ शकतो. १० रुग्णांसाठी ३० ते ३६ हजार, २५ रुग्णांसाठी ७५ ते ९० हजार, १०० रुग्णांसाठी तीन ते तीन लाख ६० हजार रुपये एवढा खर्च येतो.

महापालिकेने लोकप्रतिनिधीसह अनेकांना आवाहन केले आहे. ही मदत फक्त अन्नधान्याच्या स्वरूपात स्वीकारली जाईल, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. स्कोडाने १०० रुग्ण, यासह आयएमएचे अध्यक्ष डॉ.यशवंत गाडे यांनी २५ रुग्ण दत्तक घेतले आहेत. अतुल सावे यांनी शंभर क्षयरोग रुग्णांना दत्तक घेत त्यासाठीचा ३ लाख ६० हजारांचा निधी देखील सुपूर्द केला आहे. मात्र

केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे, खासदार इम्तियाज जलील,आमदार हरिभाऊ बागडे, प्रशांत बंब, संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, कृषीमंत्री अब्दुल सत्तार,आमदार उदयसिंग राजपूत, प्रा.रमेश बोरनारे आदींनी मात्र एकही रुग्ण दत्तक घेतला नाही, की त्यासाठी छदमाही दिला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT