मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सरकारवर टीका करत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अल्प भरपाईवर प्रश्न उपस्थित केला.
त्यांनी अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना एक कोटी तर शेतकऱ्यांना फक्त चार लाख रुपयांची मदत दिल्याबद्दल संताप व्यक्त केला.
नांदगावकर यांनी सरकारला शेतकऱ्यांच्या सन्मानाची आणि त्यांच्या योगदानाची कदर करण्याचे आवाहन केले.
MNS Distribute Fertilizer To Farmers : गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातातील दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारने एक कोटींची मदत केली. झालेली घटना दुर्दैवी होती, मदत केल्याबद्दलही तक्रार नाही, पण हाच दृष्टीकोन किंवा अशा प्रकराची मदत जगाचा पोशिंदा असलेल्या महाराष्ट्रातील शेतकरी नैसर्गिक संकट ओढावल्यानंतर टोकाचे पाऊल उचलतो. मृत्यूला कवटाळतो तेव्हा उघड्यावर पडलेल्या त्याच्या कुटुंबियाला का केली जात नाही? तेव्हा फक्त चार लाखांची मदतच का? असा सवाल मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केला.
लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी, महापूराने नूकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) आले होते. यावेळी शेतकऱ्यांना खत, बियाणांचे वाटप करण्यात आले. झालेले नूकसान भरून निघण्यासारखे नसले तरी पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा हा प्रयत्न असल्याचे बाळा नांदगावकर म्हणाले. शेतकरी संकटात सापडला आहे, त्याला नव्याने उमेद आणि जगण्याची उभारी देणे गरजेचे आहे. यासाठी केंद्र सरकारने चाळीस हजार कोटींचे पॅकेज महाराष्ट्राला द्यावे, अशी मागणीही नांदगावकर यांनी यावेळी केली.
महापूर आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी पुर्णपणे उद्धवस्त झाला आहे. राजकारण बाजूला ठेऊन, सर्व निकषांकडे दुर्लक्ष करून सरकारने सढळ हाताने शेतकऱ्यांना मदत करावी. महाराष्ट्रासाठी 30 ते 40 हजार कोटींचे पॅकेज सरकारने द्यावे, अशी आमची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मागणी आहे.अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या लातूरमधील शेतकऱ्यांना 'एक हात मदतीचा' उपक्रमांतर्गत मनसेच्या (MNS) वतीने खते आणि बी-बियाण्यांचे वाटप करण्यात आले.
सरकार शेतकऱ्यांना तुटपूंजी मदत करीत आहे, अशा मदतीत शेतकरी उभा राहू शकत नाही. शेतकऱ्यांचा संसार वाहून गेला आहे. त्यांचे पशूधन आता शिल्लक राहिले नाही, पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. जमीन खरडून गेलेली आहे. पण, सरकार अजूनही भरीव मदत करायला तयार नाही. या विषयात आम्हाला राजकारण करायचे नाही. पण सरकारने नुकसानीचा गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांच्या हिताची पावले उचलावीत, अशी अपेक्षा आहे.
खरीप वाया गेला, रबीच्या पेरण्यांचे काय ? शाळा-महाविद्यालयांचे शुल्क कसे भरायचे? असे प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहेत. त्यामुळे सरकारने 'शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू', या घोषणा प्रत्यक्षात आणाव्यात. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची, सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची गरज आहे. लाडक्या बहिणींना करोडो रूपये सरकार देत आहे. ते त्यांनी जरूर द्यावेत, पण बळीराजालाही मदतीचा हात द्यावा, त्यासाठी सरकारने गरज पडल्यास आणखी कर्ज काढावे, मात्र शेतकऱ्याला जगवावे, अशी मागणी नांदगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना केली.
अहमदाबाद विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येकाला 1 कोटी रुपयांची मदत केली. मात्र, जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर फक्त ४ लाखाची मदत केली जाते. हे अतिशय दुर्दैवी चित्र असल्याचे सांगत सध्याच्या आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
1. बाळा नांदगावकर यांनी सरकारवर टीका का केली?
शेतकऱ्यांना कमी भरपाई देऊन अन्याय होत असल्याचे सांगत त्यांनी सरकारवर टीका केली.
2. त्यांनी कोणत्या घटनेचा संदर्भ दिला?
अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांना मिळालेल्या कोटी रुपयांच्या भरपाईचा उल्लेख केला.
3. बाळा नांदगावकर कोणत्या पक्षाचे नेते आहेत?
ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) वरिष्ठ नेते आहेत.
4. त्यांनी सरकारकडे कोणती मागणी केली?
शेतकऱ्यांना सन्मानजनक आणि समतोल भरपाई देण्याची मागणी केली.
5. या वक्तव्याचा समाजातील प्रतिसाद कसा आहे?
शेतकरी संघटनांनी बाळा नांदगावकर यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.