Let.Balasaheb Thackeray-Chhatrapati Smbhajiraje
Let.Balasaheb Thackeray-Chhatrapati Smbhajiraje Sarkarnama
मराठवाडा

बाळासाहेब ठाकरे लोकनेते, त्यांचे नाव घेण्याचा सर्वांना अधिकार ; संभाजीराजेंचे रोखठोक बोल

सरकारनामा ब्युरो

बीड : राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या स्थितीत असतांना शिवसेनेने राज्यसभेची उमेदवारी नाकारलेले छत्रपती संभाजीराजे भोसले (Chhatrapati Sambhajiraje Bhosle) यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड पुकारलेल्या आमदार, मंत्र्यांनी बाळासाहेबांचे नाव न वापरता जगून दाखवावे, असे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. छत्रपती संभाजीराजे यांनी नेमकं यावर बोट ठेवत स्व. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हे लोकनेते होते, त्यांचे नाव घेण्याचा सगळ्यांना अधिकार असल्याची रोखठोक भूमिका घेतली आहे.

गेवराई येथील एका खाजगी इंग्रजी शाळेच्या उद्घाटनासाठी ते बीड (Beed) जिल्ह्यात आले होते. यावेळी प्रसार माध्यमांनी त्यांना आजच्या राजकीय घडामोडी संदर्भात त्यांची भूमिका विचारली. उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे नाव न वापरता जगून दाखवा, असे आव्हान दिले होते.

यावर छत्रपती संभाजीराजे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे हे लोकनेते होते, ते कोण्या एका पक्षाचे नेते नव्हते. त्यामुळे बंडखोर आमदारांना त्यांनी बाळासाहेबांचे नाव वापरू नये असे सांगणे चुकीचे आहे. बाळासाहेबांचे नाव घेण्याचा सर्वांना अधिकार आहे. राहिला प्रश्न सध्याच्या राजकीय परिस्थितीचा तर माझे मत असे आहे, की सरकार कुणी स्थापन करायचे ते करावे, पण शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे ज्वलंत प्रश्न सोडवावेत, असा सल्ला देखील संभाजीराजेंनी दिला.

नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेकडे पाठिंबा मागितला होता. मात्र राजेंनी शिवसेनेत यावे आणि उमेदवारी घ्यावी, अशी अट उद्धव ठाकरे यांनी त्यांना टाकली होती. परंतु संभाजीराजेंनी ती मान्य केली नाही. त्यामुळे त्यांनी निवडूणूकच न लढवण्याचा निर्णय घेतला आणि पुढे घडलेल्या नाट्यमय घडामोडीत शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराचा भाजपने पराभव केला.

यानंतर संभाजीराजे यांनी मला उमेदवारी दिली असती तर असे घडलेच नसते अशी खोचक प्रतिक्रिया शिंदेंच्या बंडखोरीवर दिली होती. त्यानंतर आता बाळासाहेब ठाकरे यांचे नाव न वापरण्याच्या उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या आव्हानवर देखील संभाजीराजे यांनी भाष्य करत शिवसेनेवर टीका केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT