Balraje Pawar police custody news : गेवराई येथे नगरपालिका निवडणुकीच्या मतदानादिवशीच भाजपचे माजी आमदार लक्ष्मण पवार, बाळराजे पवार आणि माजी आमदार अमरसिंह पंडीत यांच्या समर्थकांमध्ये मोठा राडा झाला होता. या प्रकरणात पोलीसांनी पन्नासहून अधिक संशयितांवर गुन्ह्याची नोंद केली होती. या पैकी बाळराजे पवार व त्यांच्या काही समर्थकांना गेवराई पोलीसांनी काल मध्यरात्री अटक केली. आज न्यायालयाने बाळराजे पवार यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
आरोपींच्या वकीलांनी सीटीव्ही फुटेजच्या आधारेच तीस जणांविरुद्ध पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. यातील बहुतांश आरोपींची ओळख पटली असल्यामुळे पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याचा युक्तीवाद वकीलांनी केला. त्यावर आक्षेप घेत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गेवराईत झालेल्या दगडफेक, हाणामारी पंडित-पवार यांचे समर्थक एकमेकांच्या निवासस्थान आणि पक्ष कार्यालयावर चाल करून गेले यातील आरोपींची ओळख पटवणे गरजेचे आहे. त्यांनी नावे निष्पन्न करून पुढील कारवाईसाठी आरोपींची पोलीस कोठडी मिळावी, असा युक्तीवाद दुसऱ्या बाजूच्या वकीलांनी केला.
दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश श्रुती पाटील यांनी बाळाराजे पवार यांच्यासह अन्य आरोपींना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आरोपींच्या वतीने ॲड. व्ही. एस. सानप, ॲड. ए. आर. जैस्वाल, ॲड. ए. आर. दाभाडे यांनी काम पाहिले. भाजपचे गेवराई नगर परिषद निवडणुकीतील पॅनलप्रमुख त्रींबक ऊर्फ बाळराजे पवार यांना गेवराई पोलिसांनी रात्री अटक केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
दरम्यान आज मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता एक दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. गेवराई नगर परिषदेच्या निवडणूक दरम्यान व मतदानाच्या दिवशी सकाळी प्रभाग क्रमांक 10 मधील उर्दू शाळा मतदान केंद्रावर पंडित–पवार गट आमनेसामने आले होते. यावेळी सुरुवातीला शाब्दिक वाद झाला, मात्र काही वेळातच हा वाद हिंसक वळणावर गेला.
आरोपानुसार पवार यांनी त्यांच्या समर्थकांसह कृष्णाई निवासस्थानी जाऊन माजी आमदार अमरसिंह पंडीत यांचे स्वीय सहाय्यक अमृत डावकर यांना मारहाण केली. या घटनेनंतर दुसऱ्या ठिकाणीही वाद वाढून दगडफेक व हाणामारी झाली. या मारहाणीमध्ये काही नागरिक जखमी झाले, त्यातील काहींना गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी संबंधित पीडितांनी गेवराई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीच्या आधारे गेवराई पोलिसांनी विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.
घटनेची गंभीरता लक्षात घेता बाळराजे पवार तसेच अमर राम मिसाळ, अरुण अंकुशराव पवार, महेश लक्ष्मण खंडागळे व नोमान इर्शाद महंमद यांना 16 डिसेंबर रोजी मध्यरात्री अटक करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. आज मंगळवारी गेवराई पोलिसांनी सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश श्रुती पाटील यांनी एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.