Pune Crime News  Sarkarnama
मराठवाडा

Crime News : बीड पुन्हा हादरले! चाकूने सपासप वार करत आचाऱ्याला जागीच संपवलं; रक्तरंजित हल्ल्याने परिसरात खळबळ

Beed Ghatnandur Murder Case : बीडमध्ये पुन्हा एकदा हत्याकांडाची भयंकर घटना घडली असून 21 वर्षीय आचारी असणाऱ्या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे बीड हादरले असून मोठी खळबळ उडाली आहे.

Aslam Shanedivan

Beed News : बीड जिल्ह्यात हॉटेलमधील वाद सोडवण्यासाठी गेलेल्या विलास घुले यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणावरून जिल्ह्यातील राजकीय वातावरण तंग झाले असतानाच आता अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे शनिवारी मध्यरात्री चाकूने सपासप वार करत आचाऱ्याला जागीच संपवल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर तरुणाच्या नातेवाईकांनी अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी ठिय्या आंदोलन केले. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून ज्ञानेश्वर उत्तरेश्वर वाकडे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी येथे २० जून रोजी हॉटेलमधील वाद सोडवण्यासाठी गेलेल्या विलास घुले यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी १० आरोपींना अटक करण्यात आली असून मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरभ सोनवणे यांच्या अटकेची मागणी केली जात आहे. या मागणीसाठी विलास घुले यांच्या नातेवाईक व स्थानिकांनी तीव्र आंदोलन केले होते. तसेच राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनीही अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करत कारवाईची मागणी केली होती.

त्यामुळे या प्रकरणावरून जिल्ह्यासह राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असतानाच आता पुन्हा एकदा बीड हादरले आहे. येथे अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे शनिवारी (ता. ११) मध्यरात्री ज्ञानेश्वर वाकडे या २१ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. किरकोळ वादातून ज्ञानेश्वर वाकडे याच्यावर चाकूने सपासप वार करत त्याला जागीच संपवण्यात आले. या भयंकर घटनेनंतर मृत तरुणाच्या नातेवाईकांनी अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी ठिय्या आंदोलन केले.

या बाबत मिळालेली माहिती अशी की, ज्ञानेश्वर वाकडे हा पट्टीवडगाव येथे आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होता. तो गेल्या एक वर्षापासून लातूरजवळील हायवेवरील एका ठिकाणी आचारी म्हणून काम करत होता. दरम्यान, शनिवारी रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास तो अंबाजोगाईवरून घाटनांदूरच्या दिशेने आपल्या दुचाकीवरून जात होता. यावेळी त्याच्यासोबत त्याचे आणखी दोन मित्रही होते.

हे सर्व घाटनांदूर येथील साठे चौकात आले असता तेथे त्यांचा काही जणांसोबत वाद झाला. या वादातून ज्ञानेश्वरवर चाकूने सपासप वार करण्यात आले. हा हल्ला इतका भयंकर होता की, ज्ञानेश्वरचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेल्या दोन मित्रांपैकी एक गंभीर जखमी झाला असून दुसऱ्याने तेथून पळ काढल्याने तो सुदैवाने बचावला. जखमीवर अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, मृत ज्ञानेश्वरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT