Crime News  Sarkarnama
मराठवाडा

Crime News : बीड हादरलं! लग्नानंतर अवघ्या 12 व्या दिवशी तलाठ्यानं उचललं टोकाचं पाऊल; तपासात समोर आलं धक्कादायक सत्य! पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल

Talathi Death Case : बीड जिल्ह्याती अंबाजोगाई तलाठ्याच्या आत्महत्येनं हादरलं असून पोलिसांच्या तपासात या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Aslam Shanedivan

Beed News : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे लग्नानंतर अवघ्या 12 व्या दिवशी एका तलाठ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. या घटनेनं बीड जिल्हा हादरला असून ही घटना 25 मे रोजी घडली. तर या प्रकरणात पोलिसांनी मृत तलाठ्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून धनंजय उर्फ गणेश दत्तू कोळी असं आत्महत्या केलेल्या 28 वर्षीय तलाठ्याचं नाव आहे. तर आत्महत्ये मागे तलाठ्याच्या पत्नीचे लग्नाआधी असलेले अनैतिक संबंध असल्याचे तपासात उघड झाले आहे.

याबाबत मृत तरुणाच्या आईने तक्रार दिली असून गुन्हा दाखल झाला आहे. मिळालेल्या माहिती नुसार 28 वर्षीय धनंजय उर्फ गणेश दत्तू कोळी हे अंबाजोगाई येथे तलाठी म्हणून कार्यरत होते. त्यांचा विवाह नुकताच अंबाजोगाईच्या अपर पोलिस अधीक्षक कार्यालयातील फॉरेन्सिक विभागात कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या दीपाली नावाच्या तरुणीसोबत झाला होता.

लग्नानंतर या दोघांचा सुखी संसार होईल असे वाटतं असतानाच अवघ्या 12 दिवसानंतर धनंजय यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. 25 मे रोजी धनंजय यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून अंबाजोगाई हादरली आहे.

या प्रकरणाची फिर्याद मृत मुलाच्या आईने दिल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि यात धक्कादायक सत्य समोर आले. तपासात मृत तलाठ्याच्या पत्नीचे लग्नाच्या आधीपासूनच एका तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचे उघड झाले आहे. हीच बाब तिने धनंजय यांच्याशी लपवली आणि लग्न केलं. लग्न झाल्यानंतरही ती सातत्याने तिच्या प्रियकरासोबत तासनतास फोनवर बोलत होती.

याबाबत मृत धनंजय यांना संशय आल्याने त्यांनी याबाबत विचारणा केली. पण सुरूवातीला खोटी उत्तरं मिळाली. मात्र दीपालीची वैयक्तिक डायरीत सत्य उघड झाले. ज्यात दीपाली आणि त्या तरूणाच्या अनैतिक संबंधांबाबत सविस्तर लिहलं होतं. हे सत्य वाचून धनंजय यांना धक्का बसला आणि यातूनच त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचे तपासात समोर आले आहे. यानंतर आई सुनंदा कोळी यांनी अंबाजोगाई पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादिवरून पत्नी दीपाली कोळी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT