Beed Bjp District President News  Sarkarnama
मराठवाडा

Beed Bjp District President News : भाजप जिल्हाध्यक्ष बदलणार ? की मग पुन्हा म्हस्केंच्याच गळ्यात माळ..

Bjp : राजेंद्र म्हस्के हे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात.

सरकरानामा ब्युरो

Marathwada : भाजपच्या प्रदेश कार्यकारणीनंतर आता जिल्हा व शहर कार्यकारणीच्या निवडीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी शहर-जिल्हा कार्यकारणीची निवडण प्रक्रिया सुरू झाली आहे. बीड जिल्ह्यात भाजप जिल्हाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याची चर्चा सुरू झाली आहे.

अर्थात जिल्हाध्यक्षाची नेमणूक करतांना त्याच्या तीन वर्षातील कार्यकाळाचे मुल्यमापन केले जाणार आहे. नुकत्याच झालेल्या बाजार समिती निवडणुकीत जिल्ह्यात (Bjp) भाजप दुसऱ्या क्रमाकांवर राहिली. (Beed News) महाविकास आघाडी विशेषत: राष्ट्रवादीने जिल्ह्यात चांगले यश मिळवले. त्यामुळे या यशापयशाचे मुल्यमापन करतांना जसं नेत्यांकडे बोट दाखवलं जातं, तसेच जिल्ह्याचा पक्षाचा प्रमुख म्हणून त्यांच्यावरही जबाबदीरी निश्चित केली जाते.

राजेंद्र म्हस्के हे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. जिल्ह्यातील भाजपच्या आमदार, खासदार या लोकप्रतिनिधींशी देखील त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून म्हस्के यांच्या फेरनिवडीला कुणाचा आक्षेप असणार नाही. शिवाय भाजपमधून जिल्हाध्यक्ष पदासाठी फारसे कुणी इच्छूक नसल्याने म्हस्के यांना स्पर्धा देखील नाही. त्यामुळे जिल्हाध्यक्षपदी पुन्हा म्हस्के यांची नियुक्ती होण्याची अधिक शक्यता असल्याचे बोलले जाते.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या नव्या जिल्हाध्यक्षांच्या कार्यकाळातच होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी समन्वय साधून पक्षाचा कार्यक्रम राबवणारा व्यक्तीच या पदावर नेमला जाणार आहे. म्हस्के यांच्या गाठीशी तीन वर्षांचा अनुभव आहे. शिवाय त्यांच्या नावाला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा देखील विरोध नाही. त्यामुळे म्हस्के यांना पुन्हा संधी मिळाल्यास नवल वाटायला नको..

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT