Suresh Dhas Sarkarnama
मराठवाडा

Suresh Dhas : पोलिसानं साडी नेसली अन् करुणा मुंडेंच्या वाहनात पिस्तूल ठेवलं; आमदार धस यांच्या दाव्यानं पुन्हा खळबळ

Beed BJP MLA Suresh Dhas SIT Santosh Deshmukh murder case Dhananjay Munde Karuna Sharma Munde : संतोष देशमुख हत्याप्रकरणातील SIT पथक आणि करुणा शर्मा-मुंडे यांच्या वाहनातील ठेवलेल्या पिस्तुलावर भाजप आमदार सुरेश धस यांचा खळबळजनक दावा.

Pradeep Pendhare

Mumbai News : बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासासाठी आणि आरोपींच्या शोधासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'SIT'ची घोषणा केली.

याच 'SIT'वर आक्षेप घेताना करुणा शर्मा-मुंडे यांच्या वाहनात कोणी पिस्तूल ठेवलं, याबाबत मोठा गौप्यस्फोट भाजप आमदार सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेऊन केला.

भाजप आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणात तपासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गठीत केलेल्या SITमधील काही कर्मचाऱ्यांवर संशय व्यक्त केला आहे. सत्ताधारी आमदारानेच SIT बाबत शंका उपस्थित केल्याने तपासाभोवती संशयाचे वातावरण अधिक गडद झाले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केलेल्या SITमध्ये आकाने गडचिरोलीवरून एकाची बदली करून आलेल्याची नियु्क्ती आहे. त्यांनी स्वामी निष्ठा दाखवू नये, यासाठी पोलिस (Police) अधीक्षकांचे लक्ष वेधणार आहे. काही लोक त्यांच्याशी अती कनेक्टमध्ये आहे, असाही दावा आमदार धस यांनी केला.

आमदार धस पोलिस कर्मचारी आणि आकामधील कनेक्शनवर बोलत असतानाच, करुणा शर्मा-मुंडे यांच्या गाडीत, पिस्तूल ठेवणारी व्यक्तीबाबत मोठा गौप्यस्फोट केला. करुणा मंडे यांच्या गाडीत पिस्तूल ठेवणारी व्यक्ती साडी नेसून, दुसरी-तिसरी कोणी नव्हती. ती बीड पोलिस दलातील एक व्यक्ती होती. त्याचे नाव सुद्धा मला माहिती आहे. ते नाव बाहेर मी सांगणार नाही. ते एसपींना सांगणार आहे, असे सांगून खळबळ उडवून दिली.

पिस्तूल प्रकरणाचा घटनाक्रम...

करुणा शर्मा-मुंडे 5 सप्टेंबर 2021मध्ये परळीत आल्या होत्या. तत्पूर्वी त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यातून संघर्ष उफळला होता. करुणा शर्मा-मुंडे परळीत आल्यानंतर त्यांच्याविरोधात जातीवाचक शिवीगाळ करणे आणि गाडीत पिस्तूल आढळली होती. याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता.

भाजप आमदारांचा दाव्यानं खळबळ

भाजपने या प्रकारावरून करुणा मुंडे यांची बाजू घेत अन्याय होत असल्याचे म्हटले होते. सखोल चौकशीची मागणी देखील केली होती. यातच आता सत्ताधारी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी करुणा मुंडे यांच्या गाडीत पिस्तूल ठेवण्यावरून गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT